
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड (कंधार):-चिखली ता. कंधार जि.नांदेड येथे युवा नेते प्रविण पाटील चिखलीकर व सचिन पाटील चिखलीकर यांनी मराठा आरक्षणासाठी चालु असलेल्या उपोषणस्थळी जाऊन त्यांनी उपोषणकर्ते श्री संत रतनपुरी महाराज यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली तसेच त्यांच्या सोबत उपोषणाला बसलेले चिखली येथील सकल मराठा समाजाच्या तरुणाशी चर्चा केली आणि त्यांनी त्यांच्या चालू असलेल्या मराठा आरक्षणाच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला…हाळदा येथे जाऊन मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले श्री शहाजी पाटील शिंदे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करून त्यांच्या चालु असलेल्या मराठा आरक्षणाच्या उपोषणाला पाठिंबा दिला यावेळी सर्व सकल मराठा समाज चिखली व हाळदा उपस्थित होता.