
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
कोल्हापूर: जिल्ह्यात सध्या लाचखोरीचे ग्रहण चांगलेच लागल्यांचे दिसून येत आहे. पंधरा दिवसांतील दुसऱ्या गुन्ह्यातील अटकेची कारवाई टाळण्यासाठी १ वाढीव कलम न लावता तपासात मदत करण्यासाठी ५ हजारांची लाचेची मागणी केल्याने तपासांत निष्पन्न झाल्यांने शुक्रवारी कोल्हापूरच्या लाचलुचपतच्या प्रतिबंधक पथकांने चंदगड पोलीस ठाण्यांतील पोलीस हवालदारांला ताब्यात घेतले आहे राजीव शामराव जाधव (वय ४४ ) असे या पोलीस हवालदारांचे नाव आहे… जाधव हे चंदगड पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीवरुन एका गुन्ह्यातील संदर्भात पोलीस ठाण्यात बोलून नोटीस देताना गुन्ह्यात अटकेची कारवाई नको असेल,तर व वाढीव कलम न लावता तपासात मदत हवी असल्यांस ५ हजार द्या. अशी मागणी जाधवने फिर्यादीकडे केली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल होती. पोलीस हवालदारांने आपल्या पदाचा दूरपयोग करुन तडजोडीअंती ४५०० रुपयांची लाच मागितल्यांचे निष्पन्न झाले, त्यामुळे जाधव हवालदार यांच्या विरोधात चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सदरची कारवाई पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे,पोसई संदीप बंबरगेकर, पोना संदीप काशीद,रुपेश माळे, उदय पाटील,सुरज अपराध आधीं लाचलुचपत प्रतिबंधक विभागांच्या पथकांतील पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाई सहभाग घेतला. दहा दिवसातील ही दुसरी कारवाई आहे पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता सुभद्रा कांबळे यांना २५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. आणि दहाच दिवसांत पुन्हा लाचेची मागणी केल्यांचे स्पष्ट झाल्यांने पोलीस हवालदारांवर गुन्हा दाखल झाल्यांने कोल्हापूर जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.