
सर्प मित्रांनी अजगराला दिले जीवनदान…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती :अकोला जिल्ह्यातील म्हैसांग गावानजीक पूर्णा नदीमध्ये मासेमारांनी सोमवारी (दि.९) रोजी मासे पकडण्यासाठी नदीत जाळे टाकले.मासेमारी सुरू असताना माश्यांच्या जाळ्यात अजगर अडकल्याने तेथील नागरिक आश्चर्यचकित झाले.मासेमारांनी सर्प मित्रांना संपर्क साधला.तर सर्पमित्र त्याठिकाणी पोहचल्यानंतर माशांच्या जाळ्यात अडकलेल्या सुमारे ६ ते ८ फूट लांबीचा अजगरला सर्पमित्रांनी वन्यजीवला जीवनदान दिल्याने ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.ग्रामस्थांनी सर्प मित्रांचे धन्यवाद मानत सर्पमित्रांचे यावेळी कौतुक केले.
वन्यजीव बचाव करतांना सर्पमित्र अभिजीत ढेबरे,सर्पमित्र ओम उंबरकर,सर्पमित्र पवन वंजारे,सर्पमित्र रोहन पाठे आदींनी अजगराची माश्यांच्या जाळ्यातून सूटका केली व त्याला सुखरूप सोडण्यात आले.