अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
अंबड:धनगर, मुस्लिम,मराठा,न्हावी समाजांसह विविध समाजांच्या संवेदनशील आरक्षणाच्या लढ्यात ,आरक्षणाप्रमाणेच संवेदनशील असणाऱ्या शेतीमाल चा प्रश्नांवर कुठल्याही राजकीय,सामाजिक संघटनेचे लक्ष नाही. याकरीता प्रहार शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष विदुर लाघडे यांच्या नेतृत्वात
१) सोयाबीनला ८ हजार , कापुस १२ ते १४ हजार, आणि तुर १४ हजार क्वींटल भाव देण्यात यावा. इत्यादींसह सर्व खरीप , रब्बी पिकांचे भाव पाडून शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यास सर्वस्वी जवाबदार असणाऱ्या आयात/निर्यात धोरणांत राज्य व केंद्र सरकारने बदल करावे.२)शेतकऱ्यांना सरसकट विनाखंड दिवसा मोफत विजपुरवठा करणे.
३) शेतकऱ्यांची पीके उध्वस्त करणाऱ्या वन्यप्राण्यांचा तात्काळ कायमस्वरूपी बंदोबस्त करणे.
४) २०१८/२०१९ खरीप, २०२० / २०२१ च्या मागील खरीप पिकविम्यासह ,२०२३ / २०२४ चा खरीप पिक विमा २५% रक्कम अग्रीमसह सरसगट पिकविमा मिळणे बाबद.
५)शेतकऱ्यांना उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान मधे गांजा, अफु लागवडीसाठी परवानगी आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गांजा, अफू लागवडीसाठी शासन निर्णय काढणे.
६) या वर्षी मराठवाड्यातील सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करणे बाबत.
आॕक्टोंबर मधे महाराष्ट्र सरकारने घोषित केलेले दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करणे. इत्यादी मागण्यांसाठी दि. २६ आॕक्टोंबर २०२३ गुरूवारी दुपारी १२ वाजता महालक्ष्मी पेट्रोल पंपाच्या बाजुला जालना अंबड राष्ट्रीय महामार्गावर दर्गा/पारनेर फाटा येथे प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे तहसिलदार चंद्रकांत शेळके यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना इत्यादी मागण्यांचे निवेदन प्रहार संघटनेचे अंबड तालुका उपाध्यक्ष शुभम शिंदे यांनी दिले असून या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.