
समिर शिरवडकर-रत्नागिरी
रत्नागिरी :- मागील अनेक दिवसापासून शासनाने अनेक वेळा लेखी व तोंडी आश्वासन देऊन सुद्धा कोणताही निर्णय न घेतल्याने येत्या १७ नोव्हेबर २०२३ पासून राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे संगणकपरिचालक बेमुदत कामबंद करणर असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यात शासना समोर खालील प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या आहेत.
१) सद्य स्थितीत ग्रामविकास विभागास जिल्हा परिषदेकडून प्राप्त झालेल्या अभिप्राया आधारे ग्रामपंचायतच्या सुधारित आकृतीबंधाची फाईल वित्त विभागास त्वरित पाठवून संगणकपरिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे .
२) संगणकपरिचालकांना सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळे पर्यंत २००००/- रुपये मासिक मानधन देणे
३) नव्याने सुरू केलेली चुकीची टार्गेट सिस्टिम रद्द करणे बाबत.
४) पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या जुन्या संगणकपरिचालकांना नियुक्ती देणे व ज्यांची नियुक्ती झाली आहे मागील ७ महिन्यापासून मानधन मिळाले नाही त्यांना त्वरित मानधन अदा करणे .
वरील सर्व मागण्या मान्य करण्यात येवून आम्हला न्याय मिळावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्हयातील संगणक परिचालकांच्या वेतन विषयी ( आगाऊ रक्कम घेउनही वेतन मिळत नाही) माहिती अधिकार महासंघ प्रयत्न करीत आहे.जिल्हा परिषद,पंचायत समिती स्थरावरून या अनियमित कारभाराची चौकशी लवकरचं करू- पिंट्या कोठारकर -माहिती अधिकार महासंघ जिल्हा सचिव रत्नागिरी…