दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे (इंदापूर):वर्षानुवर्ष इंदापूर तालुक्यातील जनतेने खासदार सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभेमध्ये सर्वाधिक जास्त मतदान केले आहे. सलग खासदार होऊन संसद रत्न पुरस्काराचे मानकरी होऊन बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर अजून देखील पाहिजे तेवढा विकास झालेला नाही.
इंदापूर तालुक्यातील रस्ते, शिक्षण, आरोग्य, नोकरी असे नानाविविध प्रश्न अजून देखील प्रलंबित आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून तालुक्यातील दौरे सुरू असतात त्या दौऱ्यातून ते फक्त आश्वासन देण्याचे काम करत असल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेतून होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी फक्त बारामती मध्ये सर्व सुखसोयी उपलब्ध केल्या पण आपल्याच मतदारसंघांमध्ये इंदापूर तालुका देखील येतो याची त्यांच्याकडून कदाचित भुरळ पडली असावी. असे म्हणावे लागेल.
सध्या इंदापूर तालुक्यातील जनता खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुळे यांना इंदापूराच्या जनतेसाठी कसरत करावी लागणार आहे एवढं मात्र नक्की.
