
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :- बारूळ येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष हनमंतराव मारोतराव पाटील कळकेकर यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली .त्याबद्दल . कलंबर विभाग सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कृषी अधिकारी बालासाहेब पाटील जाधव, पंचायत समिती कंधारचे सेवानिवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी एस पी जाधव यांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला. यावेळी शासकीय गुत्तेदार शिवराज पाटील कळकेकर हे उपस्थित होते . यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षांच्या काळात विद्यार्थ्यांची गुणवत्ता व शाळेतील विविध उपक्रमात निश्चित वाढ होईल असा विश्वास सेवानिवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी एस पी जाधव सर यांनी व्यक्त केला.