
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड:-लहान तांडा येथील श्री जगदंबा देवी माता व श्री.संत सेवालाल महाराज मूर्ती स्थापना व कलशारोहन सोहळा श्री. पं. पु. बाबू सिंग महाराज यांच्या हस्ते संपन्न झाला तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आमदार निधीतून सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी उपस्थित नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष गोविंदरावजीं नागेलीकर साहेब, तालुका अध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, सरपंच सदाशिव पाटील इंगळे, सतीश देशमुख लहानकर, उपसरपंच शेख महबूब, दत्तराव देशमुख लहानकर, बी. डी.देशमुख लहानकर आदित्य देवडे, एल.बी रणखांब तसेच तांडातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.