
दै,चालू वार्ता
निलंगा तालुका प्रतिनिधी इस्माईल महेबूब शेख
लातूर /निलंगा: स्थानिक गुन्हे शाखा लातूर येथील पथक निलंगा भागात गस्तीवर असताना काही संशयित इसम हत्यारासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गुप्त बातमीदारांकडून खात्रीशीर माहिती भेटली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक १३/०६/२०२४ रोजी रात्री ०९.०० वाजण्याच्या सुमारास निलंगा ते हाडगा जाणाऱ्या रोडवरील येडेश्वरी मंदिरासमोर उभा राहिलेले संशयित इसमांवर अचानक छापा टाकून गाडीची व इसमांची झडती घेतली.
पथकाला झडतीत आरोपी नामे मयुर नितीन आवचारे (वय २६ वर्षे रा. काटीपुरम चौक पिंपळे गुरव सांगवी, पुणे), अक्षय रामदास टेकाळे (वय २१ वर्षे रा. काटीपुरम चौक पिंपळे गुरव सांगवी, पुणे), विलसन ऊर्फ अविनाश पाथीराज डिमेंन्टी (वय ३१ वर्षे रा. काटीपुरम चौक पिंपळे गुरव सांगवी, पुणे), निशांत राजेंद्र जगताप (वय ३१ ‘वर्षे रा. बोपोडी सर्वे नंबर २६ भाउ पाटील रोड, पुणे), शाम गायकवाड अंदाजे (वय २६ वर्षे रा. बामणी ता. निलंगा जि. लातूर (फरार)) हे बँक आणि सराफा दुकानावर दरोडा टाकण्याचे तयारीने येवुन दरोडा टाकण्याचे साहित्य ज्यात पिस्टल-२ जिवंत काडतुस-१७ खंजर-१ एक पांढ-या रंगाच्या टाटा पंच गाडी क्रमांक एमएच १४ एलजे ३१६९ गाडी व मिरची पावडर सह एकूण किंमत १३,६४,३००/-रु.चे मुद्देमालासह दरोडा टाकण्याचे तयारीत असताना मिळुन आले.
सदर प्रकरणी कलम ३९९, ४०२, १२०(ब), भादवि सह कलम ३(१) २५, ७(अ)/२५ शस्त्र अधिनियम १९५९ प्रमाणे पो.स्टे.निलंगा येथे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतील २ आरोपी हे पुणे येथील मुन्ना जगताप गॅंग चे असून त्यांनी ढमाले गॅंग च्या दिपक कदम याचा दिनांक २९/०५/२०२४ रोजी खून केल्याने पो.स्टे.सांगवी, पिंपरी चिंचवड गुरनं २३८/२४ कलम ३०२ भादवि. सह कलम ३/२५,३/२७ शस्त्र अधिनियम या गुन्ह्यातील पाहिजे व फरारी आरोपी असल्याची माहिती मिळाली आहे. खुनाचा गुन्हा घडल्यापासून पिंपरी चिंचवड पोलिस या २ आरोपींचा शोध घेत होते. तसेच इतर २ आरोपी हे पो.स्टे. एमआयडीसी जि.लातूर येथील गूरनं ३८२/२०१९ कलम ३०२ भादवि या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.
आरोपींचा शोध घेत होते. तसेच इतर २ आरोपी हे पो.स्टे. एमआयडीसी जि.लातूर येथील गूरनं ३८२/२०१९ कलम ३०२ भादवि या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.
सदरची कारवाई सोमय मुंडे, पोलीस अधीक्षक लातूर, अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या मार्गदर्शनात संजीवन मिरकले, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लेवाड, पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस हवालदार रामहरी भोसले, पोलिस हवालदार प्रकाश भोसले, पोलीस हवालदार मोहन सुरवसे, पोलीस हवलदार राजेश कंचे, पोलीस नाईक योगेश गायकवाड, पोलीस नाईक रवी कानगुले, चालक पोलीस नाईक निटुरे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांच्या पथकाने कामगिरी पार पाडली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक पल्लेवाड निलंगा पोलिस ठाणे हे करीत आहेत.