
यळगुड हायस्कूल मध्ये नवोगतांचा प्रवेशतोत्सव समारंभ उत्साहात संपन्न.
दै.चालु वार्ता: प्रतिनिधीां
अशोक कांबळे
गारगोटी: शनिवारी सकाळी शाळेचे आल्हाददायक नवीन वातावरण… नवीन शाळा…. नवीन शिक्षक…. नवीन सवंगडी…. शाळेचा पहिला दिवस.… इयत्ता 8 वीचे नवोगत विद्यार्थी यळगुड हायस्कूल (ता.हातकणंगले) या शाळेच्या प्रांगणात जमा झाले. पुष्पवृष्टी करत या विद्यार्थ्यांचे इयता 9 वीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले. इयता 10 वीच्या विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांचे कुंकुम तिलक लावून औक्षण केले. आणि शाळेत प्रवेशित केले.
शाळेत प्रवेश केल्यानंतर घेण्यात आलेल्या स्वागत समारंभात, मुख्याध्यापक श्री. आर. डी. सारंग सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पाट्य- पुस्तक देऊन स्वागत केले. त्याचबरोबर शाळेत प्रवेश घेतल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून ते म्हणाले. “आतापर्यंत या शाळेतून बाहेर पडलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. काही विद्यार्थी वकील, पीएसआय इंजिनिअर झाले आहेत. शिक्षणाबरोबरच संस्काराची शिदोरी देण्याचे काम या शाळेने केले आहे. ती परंपरा कायम ठेवत नवीन प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांनी शाळेची उज्वल परंपरा निरंतर सुरू ठेवावी.”
श्री.एम.एन.सदलगे सर यांनी प्रास्ताविक केले, श्री.एम.आय.पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले. श्री.ए.एस. कांबळे सर यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी क्लार्क- सौ. जयश्री पाटील म्याडम, पालक- श्री. वाडकर, सुरेश गोटखिंडे, कपिल पवार, चंद्रकांत कुंभार. तसेच इतर सर्व विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.