
सर्व प्रथम सर्वांना विश्वगुरू , विश्ववंद्य भारतीय संस्कृती ची आस्मीता असणारा ,सर्व जगासाठी वरदान ठरलेल्या २१ जून जागतीक योगा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक थीम ठरवली जाते जशी मागच्या वर्षी योग वसुधैव कुटुंबकम साठी ही होती तर या वर्षी योगा स्वतःसाठी आणि समाजासाठी अशी आहे .स्व परिवर्तन से विश्व परिवर्तन की और -असा मनुष्य ते देवदूत प्रवास करण्यासाठी संस्कारक्षम माध्यम म्हणजे योगी जीवनचर्या होय .’योग’ म्हंटले की सर्वप्रथम आपणा डोळ्या समोर व मनात कवायती ,आसने, प्राणायाम व ओंकार -इत्यादी चित्र केवळ उमटतात. मात्र योग म्हणजे एवढेच नसुन ती एक जीवन जगण्याचे शास्त्र, कला आसुन सुसंस्कारी, दिव्य व सात्वीक जीवण जगण्याची पद्धत आहे. yoga is a science of life & Art of Living.
योग कोणाचे रोग, दुःख हरण करुन आरोग्य, सुख, शांती देते . या साठी शास्त्रा मध्ये एक संस्कृत श्लोक असा आहे.
युक्त आहार विहारस्य | युक्त चेष्टस्य कर्मसु ”
युक्त स्वप्नाव बोधस्य || योगाः भवति दुःखापहा: II
जो योगाचे आचरण करतो, त्याने युक्त म्हणणे सात्वीक, संतुलीत आहार, विहार करवा, नैतिकतेचे पालन करत दैनंदीन कार्य, चेष्टा करवे . योग्य, वेळेवर निद्रा ( झोप ) घ्यावी इ. तरच योगाचा शरीरा फायदा घेतो.
योग हे शास्त्र निरोगी व्यक्तीला शारिरीक, मानसीक व आत्मीक दृष्टया निरोगीच ठेवते तर रोगी व्यक्तीचे हळूहळू रोग ,दुःखही दूर करते. योग सांप्रदायिक नाही तर धर्मनिरपेक्ष मानवाला सुख, शांती, आरोग्य देणारे शास्त्र आहे.
आसन, प्राणायाम तर योगाचा एक भाग आहे. तर खरा योग हा ! आष्टांग योगाचे आचरण आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्यहार, धारणा ध्यान व समाधी हे अष्टांग योग होत . योगाचरण साधकाला’ परोपकारी, आदर्श, दिव्यगुण धारी व्यक्तीमत्व बनवतं. यात = यम= या प्रथम पायरीत समाजात राहताना नैतिक आचरण जसे अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी नकरणे) ब्राहचर्या ( संयमी जीवन ) व अपरिग्रह (वस्तुंचा स्वत:कडे अधिक मात्रेत संग्रह न करणे) हे शिकवतात . दुसरी पायरी = नियम = यामध्ये मानव वैयक्तीकता शिकते . यात शौच( शुद्धता ) संतोष ,( समाधान ) तप , स्वाध्याय , ईश्वरप्रणीधान या बोधांन वर आरूढ होण्यास शिकवले जाते . पहा आपला संस्कृती येवढी महान आहे की आधि नैतिकता मग वैयक्तीकता शिकवली जाते . Service before Self. तीसरी पायरी = आसनांनी शरीर वज्राप्रमाणे सक्षम बनते. प्राणायमात मन एकाग्र , प्रसन्न , आनंदी राहते . प्राणायमाच्या योग्य नियमन, संतुलना ने मन निग्रहीत ,काबुत राहते व मनाची मशागत होऊन निरोगी सशक्त बनते. पाचवी पायरी प्रत्यहाराच्या सहाय्याने पंचज्ञानेंद्रीये यांना त्यांच्या विषय वासनेच्या गुलामीतून सोडवली जातात . सहावी पायरी =धारणा = यामध्ये इंद्रीय क्षणीक सुखाच्या वासने पासून परावृत्त होऊन योग्य उदात्त शाश्वत ध्येय हेतुकडे मन वळविले जाते. सातवी पायरी ध्यानामध्ये मानातील चंचल वादळ शांत होऊन मन प्रसन्न, एकाग्र , आनंदी होऊन केवळ ध्येयावर स्थीर होते. मनुष्य परम सुखाकडे, समाज हितकर विधायक ध्येयाकडे, शाश्वत सुखाकडे एकग्र होतो . तर अंतीम आठवी आष्टांग योगाची पायरी – समाधी या अवस्थेत मनुष्य, विद्यार्थी पुर्ण एकाग्र ,लिनतेने पंचप्राण अपुर्ण ध्येयाची प्राप्ती करून घेतो व परमसुख प्राप्त करतो .आत्मतत्व हे परमात्म तत्वात विलीन होऊण, शाखत परमसुख प्राप्ती होते . दैवी ,परोपकारी दिव्य या अवस्थेत शरीर + मन + आत्मा जोडला जातो म्हणु ‘युज्यते अनेन इति योगाः । ‘असे’ योगाची व्याख्या केली आहे . योग चित्तवृत्ती निरोधः । म्हणजे, चित्त म्हणजे मन त्याच्या वृत्ती, भावना यांना नियमीत, नियंत्रीत करणे होय. योग्य नियंत्रीत, एकत्रीत शक्तीचा वापर करून आपण अविश्वासनीय , आणीत कार्यप्राणीमात्र व समाजहिता साठी करू शकतो . जसे वाफ कांडुन रेल्वेचे इंजीन धावू शकतो. वडे, झरे एकत्र करून जिवनदायी नदी तयार होते . म्हणून मनाची मशागत करून संपूर्ण आरोग्याची प्राप्ती होते . योगा मुळे आपले दैनंदीन व्यवहार, कार्य हे आत्मविश्वास पुर्वक, स्फुर्ती चैतन्य युक्त, परोपकारी बनतात. म्हणून सद्याच्या या गतिमान, भौतिक सुपरसोनिक युगात असांसार्गीक रोग जसे (NCD) डायबेटीज, हापरटेन्शन, ह्रदयरोग ,अस्थमा संधीवात, अमलपीत्त, त्वचा विकार यांना नियंत्र करण्यास, योगाचरण ही काळाची गरज बनली आहे. म्हणून म्हणतो आम्ही वेळ दया योगाला नाहीतर निमंत्रण मिळेल रोगाला योगशास्त्र भारताची देणगी , वरदान सर्व जगाला . भारताला अध्यात्मभूमी, देवांची भूमी म्हणतात ते या विशिष्ट परोपकारी, त्यागी, नैतिक, दैवी ,योगी विचार धारणेमुळेच .
रवींद्रनाथ टागोरांनी म्हणतात ‘विश्व हेच एक राष्ट्र आहे. विश्वबंधुत्व हाच खरा धर्म आहे. ‘जय जगत्’ ही सर्वोदयी घोषणा मानवतेची , ज्ञानी माणुसकीची दर्शन घडवणारी आहे . शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेतील आपल्या अखेरच्या भाषणात स्वामी विवेकानंदांनी असे मत प्रतिपादन केले की, मानवकुलाला संप्रदायनिरपेक्ष अशा विश्वधर्मांची गरज आहे. आणि काळाची गरज पाहता दहा हजार वर्षापुर्वी जगात जेंव्हा इतरत्र संस्कृतीचा उदय ही झाला नव्हता तेंव्हा भारत या देव भूमीने सुर्याप्रमाणे जगाला दिशा दिली आहे . शाश्वत, त्रिकालाबाधीत सत्य ,जन्मोजन्मीचे कल्याण साधणाऱ्या ,मोक्षगामी ,ऋतंभरा प्रझेवर आरूढ होऊन ऋषी , मुनी , संतांनी मानव जीवनोद्धारासाठी विविध वांङ्ममय लिहीली आहेत . यातीलच एक प्रकाशमान ,दैवी , परोपकारी , आत्मशोध घेत आत्मबोध करुन देत आत्मकल्याण साधत विश्वकल्याणास सिद्ध करणारी सुसंस्कारी राजमार्ग जीवन पध्दती म्हणजे आष्टांगयोग होय .अष्टांग योग ही सांप्रदायीक नसुन ती मानवकल्याणकारी, विश्वशांती प्रस्थापित करणारी आदर्श धर्मनिरपेक्ष नैसगीक जीवनपद्धती आहे . या संस्काराने मनुष्य विश्र्वकल्याणकारी , दैवीगुणांनी युक्त आत्मभावावर आरूढ होऊन विश्वबंधुत्वाच्या दृष्टीने हे विश्व माझ्यासाठी नसुन मी या विश्वाचा जबाबदार घटक आहे व मला तीन्ही लोकात आनंद भरण्यासाठी सर्वव्यापी संसार करायचा आहे . आष्टांग योग संत्काराने भविष्यकाळात सर्व देशांचे राष्ट्रध्वज फडकतील. राष्ट्रगीते गाईली जातील , त्यासह सगळ्यात शेवटी येईल ती विश्वध्वजवंदना आणि ‘जय जगत्’ ही घोषणा. मानवकुलास संप्रदाय निरपेक्ष अशा विश्वशांती ,मानवकल्याकारी सम, शाश्वत, अद्वैत, स्वरूप ज्ञानी दिव्यदृष्टी प्रदान करणारा अष्टांगयोग होय . हा विश्वबंधुत्वासाठी विश्वधर्म बनने ही काळाची गरज आहे . तरच निसर्गाने घेतलेले महाविनाशकारी रौद्ररूप शमेल , मानव निर्मित महाप्रलय टळेल .कारण श्रृष्टी ही प्रकृती ( व्यष्टी व समष्टी ) चा आरसा किंवा प्रतिबिंब आहे . म्हणुन जगातील सर्व मानवजातीने स्वधर्म पाळत आष्टांग योगाचे संस्कार अगदी शालेय शिक्षणात घेणे गरजेचे आहे .आता सज्य व्हा स्व- परिवर्तनातून विश्व परिवर्तनास या सुपरिवर्तनाचे साधन ते कुर्वत्तू विश्वं स्वास्थ्याम् I हे विशाल ध्येय बाळगणारी विश्वगुरू,विश्ववंद्य ,भारतीय संस्कृतीचा मुळ गाभा अष्टांगयोग तोच विश्वधर्म व्हावा . ज्या गोष्टीचे ज्ञान प्राप्त झाल्यावर इतर सर्व गोष्टीचे ज्ञान प्राप्त होते ते ज्ञानाष्टक सर्व धर्माची सारभूत शिकवण म्हणजे दैवी आष्टांगयोग होय .
सर्वे अपि सुखिनःसंतु I सर्वे संतु निरामयः ॥
🌴जय हिंद 🇮🇳 जय जगत् I🚩
डॉ.आनंद गोरख मोरे , एम .डी .
आयुष वैद्यकीय अधिकारी,उपजिल्हा रुग्णालय
परंडा तालुका ,जि: धाराशिव .
Mob.no.9423066291,
drandymore@gmail.com