पुष्प १११ वे
ज्ञानदेव बद्ध समाधी भीतरी । जग बोधे निववा मुक्ता हाका मारी ।।
न करी ती क्रोध जीभ दातांवरी । माय धरी काय राग बाळांवरी ।।
राहोनी शीतळ जनां शीतवावे । खटनटां तुम्हीच पोटाशी घ्यावे ।।
जन्माचे अज्ञानी ज्ञाने आनंदावे । वांछितीज तैसे प्राणियांसी द्यावे ।।
– आनंद
अर्थ ः- ज्ञानराज माऊली कुटी मध्ये समाधी लावून बसले आणि मुक्ताबाई बाहेरून त्यांना जगताला योग्य बोध देवून समजवा असे रुसून न बसता ताटी उघडा म्हणून हाका मारू लागल्या .
आपलीच जीभ कधी दातांमध्ये सापडून चावली गेल्यास दातांवर राग धरून चालेल काय . आई कधी आपल्या लेकरांवर राग धरते काय .
आपण चंद्राप्रमाणे शांत राहून जगतास देखील शांत करावे . खट नट असले तरी आपलीच लेकरे समजून तुम्हीच त्यांना पोटाशी घ्यावे .
जे जन्मजात अज्ञानी आहेत त्यांना ज्ञान देवून आपण आनंदी करावे . ज्यांना जे जे हवे ते ते देवून समाधानी करावे .
ह भ प आनंद महाराज काकडे
बनसारोळा ८८०५५५०३१५