
दै चालु वार्ता प्रतिनिधी पुणे/पिंपरी चिंचवड बद्रीनारायण घुगे
(पीएमपीएमएल) बस निगडी ते श्रीक्षेत्र सुदुंबरे बस सेवा चालू करण्यासाठी उद्योजक कालिदास साहेबराव गाडे पाटील यांनी मावळ लोकसभेचे संसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्याशी बस चालू करण्या संदर्भात चर्चा केली त्यावर त्वरित आप्पांनी (पीएमपीएमएल) अधिकाऱ्यांना देण्यासाठी पत्र दिले अखेर निगडी ते सुदुंबरे बस पोहचली गावात
सुदुंबरे ते निगडी बस सेवा चालू करण्या संदर्भात (पीएमपीएमएल) चे अधिकारी सतीश गव्हाणे यांना पत्र दिले त्यानंतर हि बस सेवा दि २३ रोजी सुदुंबरे गावात गेली त्यानंतर बस पुजा करण्यात आली तसेच ड्रायव्हर शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच मंगलताई कालिदास गाडे व कालिदास गाडे उपसरपंच बापू बोरकर माजी उपसरपंच ताराचंद गाडे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते
शाळेतील विद्यार्थ्यांना व कामगार विविध क्षेत्रातील नागरिकांना बससेवा लाभ होणार असल्याचे दिसुन येते हि बस निगडी देहूरोड देहू येलवाडी सुदुंबरे अशा मार्गाने धावणार आहे
सुदुंबरे ग्रामपंचायत चे सरपंच सौ मंगलताई कालिदास गाडे यांचे पती कालिदास गाडे यांनी पुढाकार संबंधित वारंवार पत्र पाठपुरावा करून अखेर गावात बससेवा चालु झाल्यामुळे कालिदास गाडे यांचे कौतुक होत आहे गावकरांच्या व परिसरातील नागरिकांना बससेवा मोठा फायदा होणार आहे ग्रामस्थ सांगितले आहे