
दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – सेरेब्रलपाल्सी या असाध्य आजन्म आजाराने बाधित असून देखील जिद्द, दुर्दम्य इच्छा शक्तीने , शारीरिक व मानसिक दुर्बलतेवर मात करत केलेले प्रयत्न आणि मातापित्यांची साथ यांच्या जोरावर नुकत्याच जाहीर झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या विज्ञान अंतिम वर्षाच्या परिक्षेत कुमार ऋषिकेश शितल सुदाम माळी, वसंतराव नाईक व बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय, म्हसळा जि. रायगड याने सुयश प्राप्त केले.
मेंदू चा पक्षाघात ( C. P) या विकारात सतत थेरपी न केल्यास दिवसेंदिवस शरिरात कडकपणा निर्माण होऊन शारीरिक हालचाली मंदावतात व परिणामी असे बालक वा मुले घराबाहेर आढळतच नाहीत तसेच त्याच्या कडून काही व्यक्त होणे देखील दुरापास्त असते.. पण अशा परिस्थिती वर मात करत वसंतराव नाईक व बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय, म्हसळा जि. रायगड या महाविद्यालयात शिकणाऱ्या ऋषिकेश शितल सुदाम माळी या ने जास्तीत जास्त दिवस कॉलेज मध्ये उपस्थित राहून कॉलेज चे प्राध्यापक रसायन शास्त्र विभागाचे प्रमुख तुषार ऊमासरे, मयूर बढे, आतिका नझीरी , राजेंद्र हालोर, सलमा नझीरी ,रायाप्पा माशाळे आणि सर्व कॉलेज मधील प्राध्यापक व एस्.एस.साळवे आणि वैभव कळस व कॉलेज सपोर्टींग स्टाफ यांनी वेळोवेळी ऋषिकेशला सर्व बाबतीत सहकार्य व मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले . तसेच कॉलेज चे प्राचार्य दिगंबर टेकळे यांनी त्याला नेहमीच सकारात्मक प्रेरणा दिली. ऋषिकेश ला भावेश गाणेकर, देव मांदाडकर, निखिल पाटील, अनमोल धनसे, सहल दलवी या वर्ग मित्रांनी व झैद धनसे, विपुल दिवेकर, जयेश जैन आणि देवराज चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य केले.
मुंबई विद्यापीठाच्या बी. एस्सी रसायन शास्त्र या कोर्स मध्ये ऋषिकेश शितल सुदाम माळी याने अंतिम श्रेणी CGPI.. 8.50/10 मिळवत कॉलेज मधील जास्त गुण मिळवणार्या विद्यार्थ्यांच्या यादी त स्थान प्राप्त केले. ऋषिकेश ची वेळोवेळी चौकशी करून त्या ची शैक्षणिक प्रक्रिया व शारीरिक व मानसिक जडणघडण सुसह्य करणारे PNP एज्युकेशन सोसायटी अलिबाग च्या कार्यवाह चित्रलेखा ताई पाटील,VNC कॉलेज म्हसळा चे अध्यक्ष मुश्ताक भाई अंतुले, VNC कॉलेज म्हसळा चे चेअरमन फजल हलदे , महादेव पाटील, नीलमताई वेट कोळी, अंजुमन कॉलेज म्हसळा चे चेअरमन..नासिर मिठागरे . न्यू इंग्लिश स्कूल , म्हसळा चे चेअरमन समीर बनकर,म्हसळा ग्रामीण रुग्णालय चे डॉ. महेश मेहता, रमेशशेठ जैन, नारायणसींग राजपूत व एस्. के. फिटनेस म्हसळा चे.व्यवस्थापक सुहेल कादरी . सार्वजनिक वाचनालय म्हसळा चे..संजय खांबेटे, पत्रकार उदय कळस . जिजामाता तरणतलाव नाशिक चे व्यवस्थापक माया जगताप व नामांकित स्विमिंग प्रशिक्षक अर्जुन सोनकांबळे दिव्यांग संघटनेचे राज्याध्यक्ष साईनाथ पवार आणि त्या ला प्राथमिक शिक्षणाचे धडे देणारे राजेंद्र पाटील यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले असून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून विशेष बालकांना घरातच न ठेवता प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे असे सर्वत्र कौतुक केले जात आहे.