
दै. चालु वार्ता:रोहा प्रतिनिधी’अजय परदेशी
भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीची एस टी बसला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वार जखमी झाला आहे तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे सदर अपघात बुधवार दि.३ जुलै २०२४ रोजी दुपारी ०२:३० वाजण्याच्या सुमारास माणगाव तालुक्यातील भागाड गावाच्या हद्दीत महाराष्ट्र सिमलेस कंपनी जवळ घडला या अपघाताची फिर्याद शुभम गणेश गडेकर (वय – २५) एस टी बस चालक रोहा आगार यांनी माणगाव पोलिस ठाण्यात दिली सदर अपघातातबाबत माणगाव पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या गुन्ह्यातील आरोपी दुचाकी चालक राजीव रंजन सिन्हा (वय – ४०) रा.पोस्को कंपनी विळे भागाड याने त्याच्या ताब्यातील लाल रंगाची ॲक्टिव्हा स्कूटी क्र. एम एच ४६ ए व्ही १२७१ ही गाडी पुणे बाजू कडून माणगाव बाजूकडे भरधाव वेगाने चालवीत घेऊन येत असताना विरुद्ध दिशेला येऊन फिर्यादी यांच्या लेनवर येऊन फिर्यादी यांच्या ताब्यातील एस टी बस क्र. एम एच ०६ बी डब्लू ८४३९ या एस टी बस ला धडक बसल्याने अपघात घडला या अपघातात दुचाकीस्वार राजीव रंजन सिन्हा हा किरकोळ जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलिस ठाण्यात रजि. नं. १७३/२०२४ भा. न्या.संहिता कलम २८१,१२५,(ए) १२५(बी) मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदर अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पवार करीत आहेत .