
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधि
मंठा/सुरेश ज्ञा. दवणे जालना (मंठा )
तालुक्यातील तळणी जिल्हा परीषद केंद्रीय प्राथमिक शाळा, शालेय व्यवस्थापन समिती कार्यकालाची वाढीव मुदतही संपली असल्याने सन-2024 ते 2026 या दोन वर्षाच्या कालावधीसाठी नवीन शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांची निवड करून समिती नव्याने गठीत करण्यात आली आहे.
यासाठी पालकांची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. तळणी येथील शालेय व्यवस्थापन समितीचे या सभेत गठन करण्यात आले. समितीच्या अध्यक्षपदी श्री.भागवत मूर्तडकर व उपाध्यक्षपदी सचिन सरकटे यांची निवड करण्यात आली. समितीच्या सदस्य पदी श्री.गजानन पातळे, अक्रम बागवान, श्री.ज्ञानेश्वर माऊली सरकटे, श्री.किशोर गायकवाड, सौ.अनुराधा बद्री हानवते, सौ.वैष्णवी कृष्णा आळंदकर, सौ.अर्चना विजय सरकटे यांची पालक प्रतिनिधी म्हणून सदस्यपदी निवड करण्यात आली. शिक्षक प्रतिनिधी श्री.सचिन गारोळे सर, शिक्षण तंज्ञ श्री.योगेश जोशी व सचिवपदी शाळेचे मुख्याध्यापक श्री.ए.टी.धारतरकर हे पदसिद्ध सचिव म्हणून निवड करण्यात आली
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करण्यात आला तसेच नवीन रुजू झालेले शिक्षक राठोड सर शिरसाट सर इंगळे सर यांचा पालकाच्या वतीने सत्कार करण्यात आला विविध वर्गातील विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते .सूत्रसंचालन शिक्षक सचिन गारोळे सर यांनी केले . यावेळेस मुख्याध्यापक श्री.ए.टी. धारतरकर सर यांनी मार्गदर्शन केले . सह र्शिक्षक डी टी शिंदे सर जी ए धारतरकर सर पी जे वराडे सर उपस्थित होते. .