
भूम परंडा वाशी तालुकास्तरीय युवा सेनेच्या बैठकीत युवा सेना संपर्कप्रमुख किरण लोहार यांचे आवाहन..
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव :- नवनाथ यादव
धाराशिव:- भूम,परंडा,वाशी विधानसभा मतदारसंघातील युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक युवा सेना राज्य विस्तारक किरण लोहार व युवा सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भूम येथील शासकीय विश्रामगृहामध्ये संपन्न झाली सदरील बैठकीमध्ये वंदनीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित झालेली शिवसेना पुढे घेऊन जाण्यासाठी युवा सेनेचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने लोकसभेमध्ये निर्णायक यश मिळवून महाराष्ट्राची अस्मिता जपली आहे,हुकूमशाही सरकारच्या नांग्या लोकसभेमध्ये जनतेने ठेचल्याच आहेत परंतु,येणाऱ्या विधानसभे च्या निवडणुकीमध्ये दळभद्री सरकारचा शेवट करण्यासाठी युवा सैनिकांनी आणखीन जोमाने कामाला लागावे असे आवाहन किरणजी लोहार यांनी या निमित्ताने केले.अल्पवनीय मुली महिला भगिनी यांची सुरक्षा वाऱ्यावर आहे,शेतकऱ्यांची कुठलीही हित जपले जात नाही,जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या मालाला भाव कमी देऊन त्यांची कुचंबना केली जात आहे,दुधाला भाव नाही,महाराष्ट्रातील उद्योग महाराष्ट्र बाहेर नेण्यांमध्ये हे सरकार मश्गुल आहे म्हणून महाराष्ट्रावरील हे दळभद्री सरकार घालविण्यासाठी व उद्धव ठाकरे सरकार पुन्हा बसविण्यासाठी युवा सेनेने वज्रमूठतयार करावी असे मत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे यांनी व्यक्त केले.धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून,पुन्हा एकदा खासदार ओम दादा प्रचंड मताधिक्याने आपल्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत,येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा तेवढ्याच ताकतीने सर्वांना सोबत घेऊन पुन्हा एकदा आपला भगवा झेंडा फडकवायचा असा निश्चय सर्वच युवासैनिकांनी या निमित्ताने केला.या बैठकीस विस्तारक किरण लोहार,शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा युवा सेना जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे, उपजिल्हाप्रमुख उमेश जाधव, विधानसभा युवा अधिकारी प्रल्हाद आडागले,युवासेनेचे भूम तालुका प्रमुख सुधीर ढगे,परंडा तालुकाप्रमुख शिवाजीराव देवकर,वाशी तालुका प्रमुख बालाजी लाखे यांच्यासह विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक विभागातील विभाग प्रमुख उपतालुकाप्रमुख तसेच शहर प्रमुख आदी उपस्थित होते.