
दै चालू वार्ता प्रतिनिधी
अशोक कांबळे
गारगोटी: हसुर बुद्रुक, ता. कागल येथील जनजागृती युवा मंच तर्फे दरवर्षी गणेशोत्सवा निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि पारंपरिक खेळांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते
यंदाही सालाबादप्रमाणे विवीध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दि.१३ ऑगष्ट रोजी सायंकाळी सात वाजता हसुर बुद्रुक येथेच महिलांसाठी पारंपरिक भव्य झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम क्रमांक ७ हजार एक रुपये आणि शिल्ड, द्वितीय क्रमांक- ५ हजार एक रुपये आणि शिल्ड, तृतीय क्रमांक 3 हजार एक रुपये आणि शिल्ड, तर उतेजनार्थ 2 हजार एक रुपये आणि शिल्ड अशी विजेत्या संघांना बक्षिसे देण्यात येणार आहेत.
प्रवेश फी रुपये ३०० असून इच्छुक संघांनी अधिक माहितीसाठी पुढील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. असे संयोजकां तर्फे आवाहन करण्यात आले आहे. मोबा-९०२१७७२१२५,९४२३२७८६०३,