
दै.चालु वार्ता
उस्माननगर ( प्रतिनिधी )
लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- उस्माननगर येथून जवळच असलेल्या लोहा तालुक्यातील पोखरभोसी येथील भूमिपुत्र ” नायक ” व्यंकटी भगवान ताटे यांनी भारतीय सैन्यदलात १७ वर्ष प्रदीर्घ सेवाकरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल व परभणी पोलीस दलात निवड झाल्याबद्दल गावक-यांच्या वतीने भव्य सत्काराचे व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी ह.भ.प.नागोराव महाराज भोसले गुरूजी ( मानखेड ) यांच्या किर्तनाचे आयोजन सायंकाळी ९ ते ११ या वेळेत आहे .या प्रसंगी शिवव्याख्याते प्रा.संभाजी नवघरे यांची उपस्थिती लाभणार आहे तर या भव्य दिव्य नागरी सत्काराला प्रमुख पाहूणे म्हणून कॅप्टन प्रकाश कस्तूरे , कॅप्टन किशन कपाळे ,
कॅप्टन संजय कदम, कॅप्टन शिवाजीराव जाधव , कॅप्टन विठ्ठलराव कदम (
अध्यक्ष जिल्हा सैनिक बोर्ड नांदेड ), निलेश राठोड (
शौर्य अॅकेडमी नांदेड ), सचिन गोमासे ( शौर्य अॅकेडमी नांदेड ) यांची उपस्थिती लाभणार आहे. दि.४ सप्टेंबर रोज बुधवार ह्या दिवशी होणा-या भव्य नागरी सत्कार प्रसंगी पोखरभोसी येथील भूमिपुत्र “नायक ” व्यंकटी भगवान ताटे यांची मिरवणूक ( रॅली ) सकाळी १० वाजता ओम गार्डन नांदेड येथून लोहा येथे येणार आहे तेथून लोहा ते धावरी मार्गे पोखरभोसी येथे रॅली येणार आहे त्यानंतर दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत गावातील प्रमुख मार्गावरून गावकऱ्यांच्या वतिने रॅली काढण्यात येणार आहे तरी पंचक्रोशीतील देशभक्त नागरिकांनी भव्य नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन किशन व्यंकटी ताटे ,सुधाकर लक्ष्मण ताटे ,दयानंद भगवान ताटे व समस्त गावकरी मंडळीं यांनी केले आहे…