गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड : – मराठा योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांचा श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथे वारकरी संप्रदायाच्या वतीने वारकरी परंपरेनुसार सम्मान करण्यात आला.
तिर्थक्षेत्र आळंदी येथे मराठा योध्दा मनोज दादा जरांगे यांचा वारकरी परंपरेनुसार हातामध्ये विणा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पगडी वारकरी उपरणे ज्या ज्ञानोबा रायांनी विश्वाला पसायदान दिले तो पसायदान ग्रंथ देऊन वारकरी परंपरेनुसार सम्मानित करण्यात आले यावेळी नांदेड भुषण वारकरी सांप्रदायाचे रत्न युवा किर्तनकार श्री ह भ प विठ्ठल महाराज गवळी शिवश्री श्याम पाटील वडजे मराठा आरक्षणासाठी सतत कार्यरत असणारे नानासाहेब पाटील वानखेडे विठ्ठल पाटील शिंदे शिवाजी पाटील कारगुडे दिलीप पाटील गवळी नितीन पाटील लक्ष्मण तापसे यांची प्रमुख उपस्थिती होती
