
प्रशांत गांधी चिटणीस,
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार
पुणे / प्रतिनिधी :
पुणे : पुणे शहरामध्ये बऱ्याच काळापासून श्वानांचा होणारा उपद्रव हा सर्वांना ज्ञात आहे
श्वान दंशमुळे रेबीज हा जीवघेणा आजार होऊन मृत्यूचा धोका देखील संभवतो अशा या भयानक आजारासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे
कुत्रा चावल्यावर वेळीच औषध उपचार न झाल्यास रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो अशावेळी महानगरपालिके ने हा विषय गांभीर्याने घेणे गरजेचे आहे आज जागतिक रेबीज डे आहे यानिमित्ताने आपणास सांगू इच्छितो श्वानांचा वावर व श्वानदंश या गोष्टी बहुतांश वेळेस आपण रात्री झालेल्या पाहतो
बरेचसे भटके श्वान ज्यांना रेबीजचे इंजेक्शन महानगरपालिकेकडून दिलेले नाही तेच श्वान असण्याची शक्यता जास्त आहे
त्यामुळे महानगरपालिकेने भविष्यात
1) रात्री उशिरा श्वानांना ताब्यात घेऊन त्यांचे ऑपरेशन करावे व रॅबिज ची लस द्यावी कारण रात्री फिरणारे भटके श्वानच जास्त धोकादायक आहेत आणि रात्रीच्या वेळीच श्वान जास्त आक्रमक असल्याचे आपण पाहतो.
2) महानगरपालिकेच्या बऱ्याचशा दवाखान्यांमध्ये या लसींचा पुरवठा नसतो त्यामुळे रुग्णांना बऱ्याच ठिकाणी फिरावे लागते. आणि अव्वाच्या सव्वा रुपया देऊन खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घ्यावा लागतो. यामुळे महानगरपालिकेने दिवसभर व रात्री उशिरा श्वानदंश झाल्यावर उपचार कोठे मिळतील याची यादी समाज माध्यमांवर जाहीर करावी…