
एखाद्या ठिकाणी प्रवासाला गेलं असता सर्वात मोठा मुद्दा असतो तो म्हणजे तिथं मुक्कामाचा. राहायचं कुठं, राहणार ती जागा व्यवस्थित आहे ना, कुटुंबासाठी योग्य आहे ना, सुरक्षित आहे ना..?
हे असे असंख्य प्रश्न यावेळी पडतात आणि मग फिरस्त्यांच्या वर्तुळातील एखादी अनुभवी व्यक्ती मदत करून जाते. एखाद्या पर्यटनस्थळी गेल्यावर राहण्यासाठीचं ठिकाण सापडल्यानंतर आणखी एक मुद्दा डोकं वर काढतो, तो म्हणजे तिथं आकारल्या जाणाऱ्या रकमेचा. पण, पुणेकर महिलेनं ही चिंता एका अनोख्या शकलेनं मिटवली आहे.
सोशल मीडियावर सध्या याच महिलेच्या नावा
ची चर्चा सुरू असून, तिनं लाखोंची किंमत आकारल्या जाणाऱ्या एका आलिशान हॉटेलमध्ये फुकटात कसा मुक्काम केला हीच बाब नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे. X च्या माध्यमातून प्रिती जैन या युजरनं तिचा अनुभव शेअर केला आणि तिनं लढवलेली शक्कल पाहून सगळेच हैराण झाले.
CA असणाऱ्य़ा प्रिती जैननं तिच्या उत्तराखंडमधील सहलीमध्ये मॅरियट या लक्झरी रिसॉर्टमध्ये मुक्काम केला. पण, यासाठी तिला एकही रुपया मोजावा लागला नाही. हे कसं शक्य झालं, याविषयी सांगताना प्रितीनं लिहिलं, ‘मी 4 लाख रुपयांचा खर्च एका कमाल सुट्टीसाठी कसा उपयोगात आणला आणि भारतातील सर्वात कमाल रिसॉर्टमध्ये कशी राहिले माहितीये? पहिल्या दिवशी आम्ही प्रिमियर रुममध्ये अपग्रेड केलं आणि त्यापुढचे दोन दिवस एक्झेक्युटीव्ह रुम जे राजेशाही थाटाहून कमी नव्हते. या रिसॉर्टमधून हिमालयाची श्वास रोखणारी झलक पाहता येते. मग ती रुम असो किंवा पूलसाईड’
वर्णन करताना इतक्यावरच न थांबता प्रितीनं या मुक्कामासाठी नेमका किती खर्च आला याचीसुद्धा माहिती दिली. अमेरिकन एक्स्प्रेसच्या प्लॅटिनम कार्डवर 4 लाख रुपयांच्या खर्चातून 58,000 मेंबरशिप पॉईट मिळाल्यामुळं प्रितीचा बराच खर्च वाचला. तिनं हे मेंबरशिप पॉईंट मॅरियट बॉनवॉय पॉईंटमध्ये वापरले. या मुक्कामात हॉटेलच्या वतीनं तिला ब्रेकफास्ट, हाय टी आणि गंगा आरतीच्या वेळी अपर डेकवरून सुरेख दृश्याची परवणी अशी सुविधांची रांग तिच्यापुढं सादर केली…