
महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली आहे. विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्याची घोषणा केली होती. जुलै महिन्यापासून महिलांना पैसे दिले जात होते.
आचारसंहितेच्या काळात महिलांना पैसे दिले नव्हते. परंतु नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे महिलांना दिले होते.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लवकरच सहावा हप्ता देण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांना मिळणार आहे. परंतु काही महिलांना या योजनेत पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नाही, असे सांगण्यात येत आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर होती. त्यानंतर आचारसंहिता लागू झाली. या काळात काही महिलांच्या अर्जाची छाणणी बाकी होती. त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची छाणणी पुन्हा सुरु केली जाणार आहे.यामध्ये ज्या महिलांच्या अर्जात काही त्रुटी आढळून येतील. त्यांना या योजनेअंतर्गत पुढचा हप्ता मिळणार नाही, असं सांगण्यात येणार आहे. (Ladki Bahin Yojana Eligibility)
या महिलांना मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे (Who Will Not Get Ladki Bahin Yojana Installment)
ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २,५०,००० पेक्षा जास्त आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती कर भरतो, अशा महिलांनादेखील या योजनेचा हप्ता मिळणार नाही.
ज्या महिला सरकारी विभागात कार्यरत आहेत किंवा ज्यांना पेन्शन मिळत आहे, अशा महिलादेखील या योजनेसाठी पात्र नाहीत.
ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे खासदार किंवा आमदार आहे त्यादेखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.