
आजकाल टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या हालचाली दिसत आहेत. कारण खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केलेय. लाखो यूझर्स Jio सोडून BSNL मध्ये गेले आहेत.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान BSNL ने 36 लाख नवीन यूझर्स जोडले आहेत. तर एअरटेल आणि जिओने त्यांचे युजर्स गमावले आहेत.
मात्र, आता जिओ असे प्लॅन ऑफर करत आहे ज्यात तुम्हाला स्वस्त दरात पूर्ण फायदे मिळत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला 150 रुपये दरमहा कॉलिंग आणि डेटा मिळेल. याशिवाय तुम्ही तुमच्या गरजेनुसार इतर दोन प्लॅन देखील चेक करु शकता. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
336 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला प्लॅन
जिओ सध्या बीएसएनएलकडे शिफ्ट झालेल्या यूझर्सना परत आणण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे आणि त्यांनी एक विशेष योजना आणली आहे. जिओचा हा प्लॅन 1,899 रुपयांचा आहे ज्यामध्ये 336 दिवसांची व्हॅलिडिटी उपलब्ध आहे. प्रत्येक महिन्याला, या प्लॅनमध्ये यूझर्सना फक्त 150 रुपये खर्च येतो ज्यामध्ये त्यांना संपूर्ण भारतभर अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण 24GB डेटा मिळत आहे.
तुम्ही हा डेटा संपूर्ण व्हॅलिडिटी कालावधीत वापरू शकता. या व्यतिरिक्त, प्लॅनमध्ये एकूण 3,600 फ्री एसएमएस सुविधा देखील उपलब्ध आहे, कंपनी Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud वर देखील अॅक्सेस देत आहे. याआधी, कंपनीने नुकतेच न्यू ईयर प्लॅन देखील लॉन्च केली होती, जी 200 दिवसांची व्हॅलिडिटी देते. यूझर्सना या प्लॅनमध्ये अनेक अतिरिक्त फायदे देखील मिळत आहेत.
हे दोन प्लॅनही व्हॅल्यू फॉर मनी
जिओ 479 रुपयांच्या प्लॅनसह येतो ज्यामध्ये तुम्हाला 84 दिवसांची दीर्घ व्हॅलिडिटी मिळते. या प्लॅनमध्ये कंपनी एकूण 6GB डेटा देत आहे. जर तुम्हाला डेटाची गरज नसेल तर तुमच्यासाठी हा प्लॅन योग्य आहे. मात्र, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा ऑप्शन उपलब्ध आहे.
जिओचा एक महिन्याचा स्वस्त प्लॅन
यादीतील दुसरा प्लॅन 189 रुपयांचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला एकूण 2GB डेटा मिळत आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे आणि यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळते. एकंदरीत, हा प्लॅन अशा लोकांसाठी आहेत ज्यांना फक्त त्यांच्या नंबरवर कॉलिंगचा लाभ घ्यायचा आहे, परंतु जर तुम्हाला अधिक डेटा हवा असेल तर या प्लॅनसोबत जाऊ नका. अन्यथा, तुम्हाला पुन्हा पुन्हा ॲड-ऑन खरेदी करावे लागतील, जे मासिक प्लॅनपेक्षा महाग असू शकतात.