
उभे राहिल्याने हटकल्याने गाड्यांची तोडफोड करत हवेत गोळीबार केल्याचा प्रकार शनिवारी (दि. 21) रात्री पावणेबाराच्या सुमारास कोंढव्यातील करीमस कॅफे येथे घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कौसर बारमधील करीमस कॅफे येथे ताहा शेख, नोमान पठाण, अब्दुला व अन्य एक मित्र असे चौघे जेवण करण्यासाठी गेले होते.
त्या वेळी अब्दुला याची मैत्रीण त्या ठिकाणी आली.
अब्दुला व त्याची मैत्रीण थोड्या अंतरावर रोडवर उभे राहून बोलत असताना तेथे तीन जण आले. त्यांनी दोघांना त्या ठिकाणी उभे न राहण्याबाबत टोकले. यावरून त्यांच्यात वाद झाला. त्याचा राग मनात ठेवून तैमुरअली पठाण (रा. गल्ली नंबर 14, सय्यदनगर, मोहंमदवाडी) याने परिसरातील मुले बोलावून घेऊन परिसरात दहशत करण्यासाठी तलवार व पेव्हर ब्लॉकने हॉटेलसमोरील गाड्या फोडल्या.
या वेळी अब्दुला ऊर्फ बकलब कुरेशी याने त्याच्याजवळील पिस्तूल काढून हवेत फायरिंग केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत कुणीही जखमी झाले नसून, पोलिसांना घटनास्थळी रिकामी पुंगळी (शेल) देखील मिळाले आहे. याप्रकरणी दोन जणांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, फायरिंग अब्दुला ऊर्फ बकलब कुरेशी (रा. सय्यदनगर, मोहंमदवाडी) याने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.