
संतोष देशमुख हत्याप्रकरणात मनोज जरांगेंचा इशारा
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी समाजाने विविध आंदोलनांना सुरुवात केली आहे. यामध्ये प्रमुख नेता मनोज जरांगे यांनी सरकारला एक कडक इशारा दिला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही फरार आहेत.
“आरोपींना वाचवू नका!”
संतोष देशमुख यांचे भाऊ, धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे यांनी खळबळजनक विधान केले, आम्ही न्यायाची वाट पाहत आहोत. आरोपींना मदत करणाऱ्यांना देखील सुट्टी मिळू नये. महाजन यांना का बडतर्फ केले नाही? चार पोलीस आरोपींच्या मदतीला आले होते, त्यांच्यावर काय कारवाई झाली? असे जरांगे म्हणाले.
संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींच्या कारवाईची मागणी करत मनोज जरांगे म्हणाले, आम्हाला संतोष भैयाचे सगळे आरोपी जेलमध्ये पाहिजेत. कुणालाही सुट्टी नाही. ज्यांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यांना देखील कारवाई केली जावी, असे स्पष्टपणे सांगितले
मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा
मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार हल्ला करत असेही म्हटले, आम्ही राज्यभर आंदोलन करणार आहोत. सरकारने फक्त दिखाऊपणा करु नये. राष्ट्रपती असले तरी कारवाई करा, नाहीतर राज्य बंद पडेल.
आंदोलनाची तयारी
आरोपींना अटक झाली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. समाज शांत बसणार नाही. सरकारने कारवाई करायला पाहिजे. आम्हाला खरेच न्याय हवा आहे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.
मी न्यायाची वाट पाहत आहे- धनंजय देशमुख
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाची प्रगती हळू आहे, आणि या संदर्भात समाजाने सवाल उपस्थित केला आहे. तपासाच्या संदर्भात धनंजय देशमुख यांनी सांगितले की, आजवर तपास संपला नाही, आणि मी न्यायाची वाट पाहत आहे. सरकारने तपास लवकर पूर्ण करावा.
मनोज जरांगे यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला की, आंदोलनाची दिशा आता वेगळी असेल. सरकारला याची गंभीरता समजायला हवी. आम्ही राज्यभर आंदोलन करणार आहोत. जोपर्यंत आरोपींना पकडले जात नाहीत, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.