
धनंजय मुंडे राजीनामा देणार?
बीड जिल्हातील संतोष देशमुख हत्या प्रकरणची चर्चा दिल्लीत सुरू आहे. बीड हत्या प्रकरणात केंद्र सरकार ही लक्ष घालत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहची भेट (Ajit Pawar Meet Amit shah) घेतली आहे.
अजित पवार यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत (Dhananjay Munde) आहेत. वाल्मिकी कराड यांना सीआयडी कडून अटक करण्यात आली आहे.
अजित पवार यांनी मुंडेंची केली पाठराखण
अजित पवार यांच्यावर धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला आहे. शरद पवार गटाकडून या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी ही केली आहे. अजित पवार यांनी अमित शाह यांची भेट घेऊन बीड जिल्हातील संतोष देशमुखच्या हत्येची माहिती दिली आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांची पाठराखण (Ajit Pawar on Dhananjay Munde) केली असल्याची माहिती आहे.
शरद पवारांच्या खासदारांना फोडण्याबाबत चर्चा
भेटीत पालकमंत्रिपदाचा तिढा आणि शरद पवारांच्या खासदारांना फोडण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. संतोष देशमुख हत्यानंतर राज्याच्या राजकारणावर अमित शाहांची करडी नजर आहे. तर धनंजय मुंडे यांच्या राजीनामावर विरोधक आक्रमक असल्याने राजीनामा घेण्याचा दबाव वाढला असल्याची माहिती आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर ही आरोप
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर ही आरोप होत आहेत. वाल्मिकी कराड हे धनंजय मुंडे यांच्या जवळीक असल्याने हत्येत मुंडे यांचा संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे.
धनंजय मुंडे यांना तूर्तास दिलासा
विरोधी पक्षाने धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. भेटीनंतर धनंजय मुंडे यांना तूर्तास राजीनामावर दिलासा मिळाला आहे. मात्र अमित शाह यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनामावर दबाव वाढला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्याकडून देण्यात आली आहे.