
भारतीय रेल्वेला जगातील चौथं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क मानलं जातं. भारतात रोज 1300 हून अधिक रेल्वे धावतात. यात मेल, एक्सप्रेस, दुरंतो, राजधानी, शताब्दी, वंदे भारत, तेजस एक्सप्रेस, हमसफर एक्सप्रेस, लोकल आणि मालगाड्यांचा समावेश आहे
या रेल्वे नेटवर्कमुळे भारतीय अर्थव्यवस्था अधिकच मजबूत झाली आहे. लोकांसाठीही रेल्वे प्रवास हा सर्वात स्वस्त प्रवास ठरत आहे. अत्यंत कमी भाड्यात लांबचा प्रवास करणं रेल्वेनेच शक्य होत आहे. भारतीय रेल्वेची ही सर्वांना माहिती आहे. पण जगातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं आहे हे माहीत आहे का? 99 टक्के लोकांना त्याची माहिती नाही. जगातील सर्ात मोठं रेल्वे स्टेशन भारतात नाही. या रेल्वे स्थानकात एक दोन नव्हे तर 44 प्लॅटफॉर्म आहेत. इथून रोज दीड लाखाहून अधिक लोक प्रवास करतात.
जगात सर्वाधिक रेल्वे नेटवर्क भारताकडे आहे. जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्मही भारतात आहे. पण पण एकाच रेल्वे स्थानकात 44 प्लॅटफॉर्म असण्याचा मान मात्र भारताकडे जात नाही. जगातील हे सर्वात मोठं रेल्वे स्टेशन एखाद्या महालासारखंच आहे. या रेल्वेस्थानकात 44 प्लॅट फॉर्म आहेत. तसेच 67 टॅक्सी आहेत. या रेल्वे स्थानकाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रेल्वे स्थानकात एक सिक्रेट प्लॅटफॉर्मही आहे. या रेल्वे स्थानकात एकावेळी 44 गाड्या उभ्या राहतात. हे रेल्वे स्थानक बनवण्यासाठी दहा वर्ष लागले होते. या ठिकाणी सिनेमाच्या शुटिंगसही होतात.
ग्रँड सेंट्रल टर्मिनल
या रेल्वे स्टेशनचं नाव ग्रँड सेंट्रल टर्मिनल असं आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात हे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकाचं नाव गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवलेलं आहे. या ठिकाणी 1.5 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. 48 एकराहून अधिक जागेवर हे स्टेशन बनवलं गेलं आहे. महालासारखंच हे स्टेशन दिसतं. या ठिकाणी अनेक हॉलिवूडच्या सिनेमाचं चित्रीकरण झालंय. या ठिकाणी येणारे लोक स्टेशनचा फोटो काढल्याशिवाय राहत नाहीत. या स्टेशनची डिझाइन निव्वळ अप्रतिम आहे. प्रत्येकाला ही डिझाईन आकर्षित करत असते.
सीक्रेट प्लॅटफॉर्म
या रेल्वे स्थानकात एक सीक्रेट प्लॅटफॉर्मही आहे. वाल्डोर्फ एस्टोरिया हॉटेलच्या खालीच हा प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर तत्कालीन राष्ट्रपती फ्रँकलिन रुझवेल्ट करायचे. नियमित वापरासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला जात नव्हता. तुम्हालाही कधी या रेल्वे स्थानकात जाण्याची संधी मिळाली तर नक्की जा. नवा अनुभव येईल.