
अभिनेत्याला द्यावे लागणार कोट्यवधी रुपये, नेमंक प्रकरण काय?
बॉलीवुड सुपरस्टार शाहरुख खानचा बंगला मन्नत देखील शाहरुख खानप्रमाणेच प्रसिद्ध आहे. दर आठवड्याला शाहरुख खानचे हजारो फॅन्स शाहरुखची एक झलक पाहाण्यासाठी मन्नतबाहेर गर्दी करतात. शाहरुख देखील आपल्या चाहात्यांची निराशा करत नाही.
तो बंगल्याच्या टेरेसमध्ये जाऊन आपल्या चाहात्यांची भेट घेतो. हात उंचावून त्यांना अभिवादन करतो. शाहरुखची भेट झाल्यानंतर त्याच्या चाहात्यांना समाधान वाटतं, त्यांना प्रचंड आनंद होतो.शाहरुख खानसाठी त्याचा हा बंगला खूप लकी आहे. शाहरुख खान देखील आपल्या या बंगल्याबाबत भरभरून बोलतो. या बंगल्यानं मला अनेक चांगल्या गोष्टी दिल्याचं तो म्हणतो. त्यातच आता हा बंगला शाहरुख खानला पुन्हा एकदा नऊ कोटी रुपये देणार आहे, जाणून घेऊयात हे नेमकं प्रकरण काय आहे?
सरकारच्या चुकीचा फायदा
शाहरुख खानने 2019 मध्ये मन्नतचा मालकी हक्क मिळवण्यासाठी 25 टक्के रक्कम जमा केली होती. त्याची आधारभूत किंमत 27. 5 कोटी रुपये ठेवण्यात आली होती. मात्र ही रक्कम जमिनीच्या आधारावर नाही तर संपूर्ण बंगल्याच्या आधारावर गृहित धरण्यात आली होती. ही चूक लक्षात येताच शाहरुख खानची पत्नी गौरी खानने ही चूक सरकाच्या लक्षात आणून दिली, आणि परतफेडीची मागणी केली. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे, ती म्हणजे वेगवेगळ्या वृत्तपत्रांकडून मिळालेल्या रिपोर्टनुसार सरकार आता आपली ही चूक सुधारण्यासाठी शाहरुख खानला 9 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देणार आहे. याचाच अर्थ आता शाहरुख खानला सरकारकडून तब्बल नऊ कोटी रुपये मिळणार आहेत.
शाहरुखच्या या बंगल्याबाबत बोलायचे झाल्यास शाहरुखचा मन्नत बंगला हा बांद्रा पश्चिमेला आहे. 2,446 स्केअर फूट एवढं या बंगल्याचं क्षेत्रफळ आहे. शाहरुख खाने याने आपल्या बंगल्याचा मालकी हक्क मिळवण्यासाठी 25 टक्के रक्कम जमा केली होती. याचवेळी सरकारकडून ही चूक झाली, त्यानंतर शाहरुख खानची पत्नी गैरी खानने ही चूक सरकारच्या लक्षात आणून दिली, आता त्याला नुकसानभरापाई म्हणून नऊ कोटी रुपये मिळणार आहेत.