
शिवसेनेच्या बड्या नेत्याचा टोला..!
एकनाथ शिंदेंनी निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून पक्ष ताब्यात घेतला. बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष ताब्यात दिला नाही. अमित शाह यांचा फोटो एकनाथ शिंदेंनी लावायला हवा. कारण अमित शाह हे त्यांचे दैवत आहेत.
अमित शाहांनीच हे सर्व कांड केलं”, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. आता यावर शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने संजय राऊतांनी त्यांच्या देव्हाऱ्यात शरद पवारांचा फोटो लावावा आणि त्याच्या पाया पडावे”, असा टोला लगावला आहे.
शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी संजय राऊतांना सडेतोड उत्तर दिले. तसेच यावेळी त्यांनी शरद पवारांचाही उल्लेख केला.
सिल्व्हर ओक म्हणजेच आता तुमचं मातोश्री
“तुमच्याच देव्हाऱ्यात शरद पवारांचा फोटो लावा आणि रोज त्याच्या पाया पडा, कारण त्यांना मातोश्रीची आठवण आता राहिलेली नाही. त्यामुळे सिल्व्हर ओक म्हणजेच आता तुमचं मातोश्री झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही कितीही बक बक केली तरी आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही, असे मंत्री संजय शिरसाठ म्हणाले. संजय राऊत यांची लायकी किती? आवाका किती? आणि त्यांची उंची किती? आमच्या आशीर्वादाने खासदार झालेला माणूस आम्हाला शहाणपण शिकवत आहे”, असेही संजय शिरसाठ म्हणाले.
यावेळी संजय शिरसाठ यांना अब्दुल सत्तारांच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “ते लोक प्रतिनिधी असल्याने त्यांच्यामागे जास्त काम आहेत. त्यामुळे ते आले नसतील”, असा टोला त्यांनी लगावला. त्यांच्यावरती बोलणं टाळलं.
संजय राऊत काय म्हणाले होते?
पक्षात काही बदल नक्कीच होणार आहेत. फक्त नाशिक मध्ये नाही तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात बदल होणार आहेत. अनेक नवीन कार्यकर्ते पक्षाशी जोडले जात आहेत. काही लोक मोह माया लोभ लाभ यासाठी जात आहेत. रोज बातम्या येतात. पण जिथे जातात ती खरी शिवसेना नाही. चंद्राबाबू यांनी पक्ष फोडला नव्हता. एकनाथ शिंदे भाजपचा निकाल संशयास्पद होता. अजित पवारांचाही निकाल संशयास्पद होता. निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून पक्ष ताब्यात घेतला. बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष ताब्यात दिला नाही. अमित शाह यांचा फोटो एकनाथ शिंदेंनी लावायला हवा. कारण अमित शाहा हे त्यांचे दैवत आहेत. अमित शाहांनीच हे सर्व कांड केलं. अमित शाह आणि मोदी काय अमृत पिऊन आले नाही, अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली होती