
दोन स्टार खेळाडूंचा डेब्यू, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन!
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूरमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवला जातोय.
जॉस बटलर याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणार असल्याचं म्हटलं तर टीम इंडियामध्ये मोठा बदल झाला असून विराट कोहली (No Virat kolhi in Playing XI) याला आराम देण्यात आला आहे. रोहित शर्मा याने याचं कारण देखील सांगितलं. विराट कोहलीच्या जागेवर यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे.
विराटला बाहेर का बसवलं?
विराट कोहली इंग्लंडविरुद्धचा पहिला वनडे सामना खेळणार होता. पण विराट आजच्या सामन्यात खेळणार नाहीये. काल रात्री त्याच्या गुडघ्याला सुज आल्याने त्याला न खेळवण्याचा निर्णय घेतला गेला, असं रोहित शर्माने (Rohit Sharma) म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियाच्याविरुद्धच्या कसोटी मालिकेत देखील विराटच्या गुडघ्याला सुज आल्याची बातमी समोर आली होती. अशातच आता विराट नागपूर वनडे खेळणार नाहीये.
यशस्वी आणि हर्षितचा डेब्यू
टीम इंडियामध्ये दोन खेळाडूंचा डेब्यू करण्यात आला आहे. स्टार सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि हर्षित राणा या दोन खेळाडूंना पहिल्यांदाच प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. तर मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांचं कमबॅक झालंय. तर विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतच्या जागेवर केएल राहुल याला प्राधान्य दिलं गेलं आहे.
टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): बेन डकेट, फिलिप साल्ट (विकेटकिपर), जो रूट, हॅरी ब्रूक, जॉस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.