
१५ दिवसांत जोतिबा प्राधिकरण मंजूर करणार – मुख्यमंत्र्यांनी केलं जाहीर
किल्ले पन्हाळगड पुन्हा स्वराज्यात आणण्याच्या शौर्य दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी किल्ले पन्हाळगडावर 13डी थिएटरचं उद्घाटन करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांचा अक्षरशा पाऊस पडला.
आमदार विनय कोरे यांच्या या कामाचं कौतुक करत त्यांनी किल्ले पन्हाळगड याबाबत राज्य सरकार आराखडा तयार करत असून तो पुन्हा शिवकालीन रूपात बांधणार बांधण्याचा प्रयत्न केला जाईल, तसेच वाडी रत्नागिरी येथील ज्योतिबा डोंगरावरील प्राधिकरण येत्या पंधरा दिवसांत मंजूर करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, गुरुवारी ते कोल्हापुरात बोलत होते. पन्हाळगड येथे गुरुवारी 1 डी थेटरचे उद्घाटन पार पडले. या सोहळ्याला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पन्हाळगडचा ऐतिहासिक क्षण आम्हाला अनुभवायला मिळाला, त्या आमदार विनय कोरे यांचं खूप आभार. शौर्य आणि विजय दिनी या 13डीचे लोकार्पण माझ्या हातून होतो याचा आनंद मला आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास हा भारतीयांचा इतिहास आहे. परक्यांच्या आक्रमणानंतर भारतीयांवर अत्याचार सुरू झाले, अनेकांनी मांडलीकी पत्करली, ही काळरात्र संपणार नाही असं वाटत असताना राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. छत्रपती आहेत म्हणून आपण आहोत छत्रपती नसते तर आपण मुळीच या ठिकाणी नसतो.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आराध्य दैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांची अशी फौज तयार केली की त्यांनी अटकेपार मराठा झेंडा नेला. पण विनय कोरे मी तुम्हाला सॅल्युट करतो, आपल्या महाराजांचा इतिहास आपल्या गडकिल्ल्यांचा जाज्वल्य इतिहास तुम्ही लोकांसमोर पोहोचवण्यासाठी असला जबरदस्त प्लॅन केला आहे. असा शब्दात आमदार विनय कोरे यांचे कौतुक केले.
याचबरोबर किल्ले पन्हाळगडाबाबत ऐतिहासिक कागदपत्रे देशभरातून आमदार विनय कोरे यांनी गोळा केलेली आहेत. ते पुन्हा शिवकालीन रुपात येण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. राज्य सरकार गड किल्ले संवर्धनाबाबत आराखडा तयार करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला किल्ला असा असेल जो शिवकालीन रूपाने पुन्हा तयार केला जाईल, तो किल्ला म्हणजे पन्हाळगड असेल. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी आश्वासीत करतो की यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा निधी माझ्याकडून देण्यात येईल, निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
ज्योतिबा डोंगरावरील अतिशय सुंदर आराखडा तयार केला आहे, पण त्याचा प्राधिकरण झाला पाहिजे हा आमदार कोरे यांचा आग्रह आहे. तर पुढच्या पंधरा दिवसात प्राधिकरण स्थापन करून देतो. याची घोषणा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.