
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
टेंभुर्णी पोलीस स्टेशन व अकलूज पोलीस स्टेशन यांची संयुक्त कामगिरी
पुणे (इंदापूर):- टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील श्री नरसिंह नगर टेंभुर्णी येथे नरसिंह प्रतिष्ठान नरसिंह नगर टेंभुर्णी यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री गणेश मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने चोरून नेले होती बाबत नरसिंह प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद केशव पवार यांनी फिर्याद दाखल केली होती.
श्री गणेश मंदिरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला असता,यातील आरोपी नामे युवराज उर्फ सोन्या दादा खंडागळे वय २२वर्ष रा. महर्षी कॉलनी अकलूज ता. माळशिरस जिल्हा सोलापूर येथील असल्याची व तो दि. १४/३/२०२५ रोजी अकलूज येते आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.. टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के,पोलिस अंमलदार विनोद साठे, पोलीस अंमलदार संदीप गिरामकर, विलास नलवडे, प्रवीण साठे तसेच अकलूज पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार शिवकुमार मदभावी यांनी अकलूज येथे सदर आरोपीला ताब्यात घेतले व अधिक चौकशी केली असता आरोपीने दानपेटीतील पैसे चोरी केल्याचे कबूल केले आहे.
पुढील तपास पोलीस अंमलदार संदीप गिरमकर हे करत आहे.नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने पोलीस निरीक्षक दीपक पाटील व सर्व स्टाफ चे अभिनंदन करून आभार मानण्यात आले.. तसेच येईल त्या संकष्ट चतुर्थीला सर्व स्टाफ चा भव्य सत्कार समारंभ नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार आहे.