
दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी -ज्ञानेश्वर साळुंके
माथेफिरू सीसीटीव्हीत कैद पंधरा दिवसातील दुसरी घटना
अंबड: तालुक्यातील फोर व्हीलर ही नेहमीप्रमाणे घरासमोरील लावलेली अल्टो कार दोन अज्ञातांनी पेट्रोल टाकून पेटुन दिल्याची घटना शुक्रवारी (दि-१४) रोजी रात्री बाराच्या सुमारास अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव येथे घडली आहे.सदर कार जळुन खाक झाली असुन सुदैवाने घराला आग लागणार तेवढ्यात ग्रामस्थांनी ती विझवली व विशेष म्हणजे पंधरा दिवसातील ही गाडी पेटवुन देण्याची दुसरी घटना आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, मठपिंपळगाव येथील आकाश नंदकिशोर जिगे हा जालना येथील एका खासगी रुग्णालयात काम करतो.तेथील एका मित्राने चारचाकी गाडी क्र. (एम.एच.20.ई. वाय. 6846) तीन महिन्यांपासून जाण्यायेण्यासाठी त्याला दिलेली होती.नेहमीप्रमाणे आकाश याने घरासमोर वर लाऊन परिवारासह झोपलेले असतांना रात्री बाराच्या सुमारास दोन तरुण दुचाकी आले.त्यांनी आजुबाजुला अंदाज घेतला. त्यातील एकाने दुचाकीची डिग्गी उघडुन त्यातुन पेट्रोलची कॅन काढुन गाडीवर पेट्रोल टाकली.व माचीसने गाडी पेटवुन दिली.पेटलेल्या गाडीचे टायर फुटल्याने आवाज झाला.तेव्हा घरातील सदस्य जागी होऊन बाहेर बघीतले तेव्हा आगीचचा भडका व धूर दिसला.आगीमुळे टायर व गाडीच्या धुराने घरातील सदस्यांना श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला.घरात एक छोटे बाळ होते.घरातील सदस्यांनी पाठीमागून स्लॅपवर सुरक्षीत जागी आसरा घेतला. आगीची घटना गावात पसरली तेव्हा आजुबाजुचे शेजारी व गावातील तरुण जागी झाले.त्यांनी तात्काळ पाणी मारुन आग विझवली.सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने लावलेले सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता.घटना त्यात कैद झालेली होती. त्यात दोन अज्ञात तरुणांनी हे कृत केल्याचे लक्षात आले.याप्रकरणी अंबड पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पंधरा दिवसातील दुसरी घटना…
मठपिंपळगाव येथे दीड दोन वर्षांपूर्वी एक दुचाकी पेटवुन दिली होती.त्यानंतर पुन्हा पंधरा दिवसांपूर्वीही गावातील एक दुचाकी पेटवुन दिली.हे प्रकरण ताजे असतानाच चारचाकी वाहन पेटवुन दिल्याने ग्रामस्थांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक सिध्दार्थ बारवाल यांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.लवकरात लवकर या घटनेचा छडा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केल आहे.