
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी निगडी ( पिंपरी चिंचवड )-धनाजी साठे
निगडी:- दि.१५ मार्च रोजी दुपारी निगडी ते आकुर्डी स्टेशन या मार्गावर प्रवासा दरम्यान,
प्रवासी किरण आहेर यांची मनीपर्स बसमध्ये विसरून राहिली होती.
बस शेवटच्या स्थानकावर गेल्यानंतर मनीपर्स बसमध्ये कोणीतरी विसरुन गेल्याचे,
वाहक धनेश तिकोने व चालक दादा खारे यांच्या निदर्शनास आले.,लगेचच त्यांनी स्थानक प्रमुख यांच्याश.
संपर्क साधून सदरील मनीपर्स सापडली असल्याची माहिती देऊन स्थानक प्रमुख राजु जाधव साहेब यांच्याकडे जमा केली.
काही वेळाने संबंधित प्रवासी हे मनीपर्स बाबत विचारणा करण्यासाठी स्थानकावर आले असता,
मनीपर्स मधील रोख रक्कम ३१५० रू.व इतर सर्व गोष्टींची शहानिशा करुन खात्री पटल्यानंतर,
संबंधित प्रवासी किरण आहेर यांना स्थानक प्रमुख जाधव यांच्या हस्ते त्यांना परत करण्यात आली.
पीएमपीएमएल सेवकाने दाखविलेल्या प्रमाणिकपणाबद्दल संबंधित प्रवासी यांनी पीएमपीएमएल कर्मचारी यांचे आभार मानले.
याबाबत पीएमपीएमएलचे
चालक – वाहक यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.