
दैनिक चालु वार्ता म्हसळा रायगड प्रतिनिधी- अंगद कांबळे
म्हसळा -दिघी पुणे राष्ट्रिय मार्गावरील म्हसळा आणि माणगाव तालुक्याचे हद्दीतील चांदोरे गावालगत हॉटेल अन्नपूर्णा समोर भर दुपारी चालत्या कारने पेट घेतल्याने बर्णींग कारचा थरार अनुभवायला मिळाला.बघता बघता डोळ्या देखत अवघ्या पाच-दहा मिनिटात कार जळून खाक झाली.होळी उत्सवाची सुट्टी पडली आसल्याने गुरुवार पासून श्रीवर्धन- हरिहरेश्वर- दिवेआगर येथे मोठ्या संख्येने पर्यटक आले आहेत.रविवारी सकाळ पासुन अनेक पर्यटकांची परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.पुणे येथील स्मिता सुनिल पवार यांचे मालकीची कार क्रमांक एमएच १४ इएम २४०० जॅग्वार मधुन गाडीतील पर्यटक परतीचा प्रवास करत असताना कार म्हसळा लगत आसलेल्या चांदोरे गावाजवळ आली असताना कारने अचानक पेट घेतल्याने आगीत गाडी जळून खाक झाली.लागलीच गाडीतील पर्यटक बाहेर पडल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.सदरची घटना रविवारी दुपारी २.३० वाजता घडली.घटनेची माहिती माजी सभापती महादेव पाटील यांनी म्हसळा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन कहाले यांना कलवताच सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिंनकर व त्यांचे सहकारी पोलिस घटनास्थळी पोहोचले.पर्यटकांनी गाडी विझविण्याचा प्रयत्न केला होता परंतु भर दुपारचे उन्हात गाडीने जोरदार पेट घेतल्याने डोळ्या देखत अवघ्या काही मिनिटांत गाडी जळून खाक झाली.