
दैनिक चालु वार्ता वैजापूर प्रतिनिधी -भारत पा सोनवणे
शिऊर(वैजापूर):- महाराष्ट्र हि संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. याच संतांपैकी माहाराष्ट्राच्या मातीला लाभलेले महान संत म्हणजे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्यांनी आपल्या अभंगा मधून कीर्तनामधून समाजप्रभोधनाचे काम केले, दिनदुबळ्यांना सोबत घेऊन सर्व जाती धर्माच्या गुण्यागोविंदाने राहण्याच्या संदेश त्यांनी आपल्या अभंगा मधून आपणास दिलेला आहे. संत तुकाराम महाराज सामाजिक प्रबोधनाची मुहूर्त मेढ रोवणारे निर्भीड संत कवी होते.
संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे कळस आहेत जगद्गुरू तुकोबारायांनी संपूर्ण जगाला अध्यात्माची शिकवन देऊन भक्ती मार्गाला लावले. मानव असून सदेह वैकुंठ गमनाचे सामर्थ्य दाखवणारे संत म्हणजे संत तुकाराम महाराज होय. फाल्गुन वद्य द्वितीयेला सदेह वैकुंठ गमन झाले. याच दिवसाला तुकाराम बीज म्हणून ओळखतात. संत तुकाराम बीज सोहळ्याला अनेक वर्षांची परंपरा आहे.
वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे संत जगदगुरु तुकाराम महाराज बीजोत्सवा निमीत्त ह.भ.प.वै.गुरवर्य रंगनाथ (स्वामी) माहाराज भिंगारे याच्यां कृपाआशीर्वादाने ९ तारखेपासुन चालु असलेला अखंड हरिनाम सप्ताह व शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी शिव महापुराण कथा व ह.भ.प.गणेश महाराज जाधव धोदलगाव, ह.भ.प.ज्ञानेश्चर महाराज मधाने शिऊर ह.भ.प.सारंगधर महाराज भोपळे (शास्त्री)उपाध्यक्ष संत शंकरस्वामी महाराज संस्थान, शिऊर, ह.भ.प.नवनाथ महाराज जाथव छत्रपती संभाजीनगर, ह.भ.प. शिवाजी महाराज काळे विश्वस्थ वा.शि. संस्था आळंदी ह. भ.प.सुरेश महाराज मगर नाशिक, ह.भ.प.गंगाधर महाराज कवडे संत तुकाराम म. विद्यार्थी गुरुकुल नाशिक, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगाव, ह.भ.प.पंढरीनाथ महाराज पगार अध्यक्ष श्री, संत शिवाई संस्थान शिऊर ह.भ.प.महादेव महाराज राऊत बिड, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज शिंदे (माऊली)अध्यपाक वा.शि. संस्था, आळंदी, ह.भ.प.उमेश महाराज दृशरथे आळंदी देवाची, ह.भ.प.चैतन्य महाराज देगलुरकर, ह.भ.प.भागिरथ महाराज काळे सिन्नर यांचे कीर्तन सेवा झाली. ह.भ.प.उत्तम महाराज साळूके यांच्या काल्याचे कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली त्यानंतर पुरण पोळीचा गोड महाप्रसाद घेतला त्यावेळी अध्यात्मिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांसह हजारो भाविकांची उपस्थिती होती.