
दैनिक चालु वार्ता उमरगा वार्ताहर –
उमरगा (धाराशिव)
महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे मार्फत घेतल्या जाणाऱ्या एसएससी बोर्ड परीक्षा महाराष्ट्र राज्यातील नऊ परीक्षा मंडळाच्या वतीने उत्तम नियोजन करून घेण्यात येत आहेत. मराठवाड्यातील लातूर उपविभागीय परीक्षा मंडळाच्या वतीने दिनांक 15/03 2024 रोजी. विज्ञान भाग -2 विषयाच्या लातूर विभागातील धाराशिव, लातूर ,नांदेड, जिल्ह्याच्या नियमाच्या बैठकीत परीक्षा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग साहेब सचिव अनुपमा भंडारी मॅडम
ओ.एस जेवळीकर चंद्रकांत वैजनाथ विज्ञान विभाग प्रमुख गायकवाड व्ही एस मॅडम विज्ञान भाग दोन चे बोर्डाचे मुख्य नियमक मनोजकुमार गुरव सर. यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाले.
तिन्ही जिल्ह्याचे मिळून एकूण 113 नियमकाची नियुक्ती करण्यात आली असून. प्रत्येक नियमाकडे पाच परीक्षक नेमुण प्रत्येकी 200 पेपर देऊन मूल्यांकन करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग साहेब यांनी विद्यार्थ्यांचे हित समोर ठेवून वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यात यावा.
देशातील लोकांचे भविष्य घडवण्याचे पुण्याचे काम शिक्षकाचे हाती असून ते आनंदाने करावे असे आवाहन करण्यात आले.
मंडळाचे सचिव अनुपमा भंडारी मॅडम उपस्थित सर्व नियमांना मार्गदर्शन करताना शिक्षकांनी कोणतेही ताण न घेता स्वतःच्या जीवाची काळजी घेऊ मूल्यमापनाचे काम करावे असे विनंती केले.
त्यावेळी विज्ञान भाग दोन चे मुख्य नियामक मनोजकुमार गुरव सर यांनी राज्य मंडळ पुणे निर्देशाप्रमाणे मूल्यांकनाच्या पद्धती आणि दुरुस्ती सर्व नियमकाना मार्गदर्शन केले.
विभागीय परीक्षा मंडळ लातूरच्या वतीने सर्व विषयाचे पेपरच्या मूल्यांकनाचे कामाचे नियोजन व्यवस्थितपणे केले कारणाने. राज्याच्या नियोजित वेळेत निकाल लावण्यासाठी लातूर बोर्ड अग्रगण्य राहील असे याचे नियोजन लातूर बोर्डातील सर्व कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आले आहे.