
दैनिक चालु वार्ता रत्नागिरी प्रतिनीधी -समिर शिरवडकर
राजापूर :- ( होळी) कोकण रेल्वेच्या कोचिवली एक्स्पेसमधून मुंबईला जाणाऱा प्रवासी रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे चढत असताना पाय घसरुन पडला. गंभीर जखमी तरुणाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. रुपेश एकनाथ गुरव (वय ४२, रा. होळी-जैतापूर, ता. राजापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १५) सकाळी पावणेनऊच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन पलाट क्र. २ येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रुपेश मुंबईला जाण्यासाठी कोचिवली-इंदोर एक्स्प्रेस मध्ये चढत असताना त्याचा पायघसरुन तो पडला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. तात्काळ त्याला रेल्वे पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र गंभीर जखमी रुपेश वर उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
राजापूर मधील होळी गावात वार्षीक शिमगोत्सव साठी अनेक चाकरमानी गावी येत असतात,आणि रुपेश सुध्दा आपल्या होळी गावात आपल्या गावी आला होता,शिमगोत्सव आटपून सकाळी लवकर उठुन त्यानी रत्नागिरी गाठली,रेल्वेत चढत असताना त्याच्यावर काळाने झडप घातली.उपचारादरम्यान रूपेश ची प्राणजोत मालवली,ही खबर कळताच संपूर्ण होळी गाव सुन्न झाले, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला राहते घरीं आणुन त्यावर अंत्यसंस्कार करण्यांत आले.रुपेश च्या पच्यात आई,वडील,पत्नी,बहीण ,व छोटा मुलगा,असा परिवार आहे.