
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी- तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण):– पैठण येथे औरंगाबाद येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन, उच्च न्यायालय मुंबई न्यायमूर्ती रवींद्र विठ्ठलराव घुगे यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमास अतिथी म्हणून उच्च न्यायालय मुंबई न्यायमूर्ती यनशिवराज गोपिचंद खोब्रागडे, उच्च न्यायालय मुंबई न्यायमूर्ती संजय आनंदराव देशमुख हे उपस्थित हाेते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश औरंगाबाद श्रीमती विभा प्रभाकरराव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पैठण येथे दि. 16 मार्च रविवार रोजी सकाळी दहा वाजता दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसर पैठण तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद येथे संपन्न झाला. याबाबतची माहिती पैठण वकील संघाचे सचिव अँड. सुभाष खडसन यांनी दिली. यावेळी कार्यक्रमास उपस्थित पैठण न्यायालयाचे न्यायाधीश राजेश्वर गाढवे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश-1 पैठण, मा. न्यायाधीश श्रीमती रोकडे, श्री. कनकदंडे, श्रीमती.बाफना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे, एसडीएम निलम बाफना, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, डीवायएसपी सिध्देश्वर भोरे, पोलीस निरिक्षक संजय देशमुख, पैठण तहसिलदार दत्ता भारस्कर, न.प. मुख्याधिकारी संतोष आगळे, एमआयडीसी सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे, दुध संघाचे नंदलाल काळे, माजी राज्यमंत्री अनिल पटेल, माजी आमदार संजय वाघचौरे, दत्ता गोर्डे, डॉ. राम लोंढे, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे, शहादेव लोहारे, वकील संघाचे अध्यक्ष संदिप जाधव, सचिव ॲड. सुभाष खडसन, अँड.पहिलवान, ॲड काकडे, ॲड गायकवाड, ॲड गवांडे, ॲड गव्हाणे, ॲड फकिरा, ॲड बागवान, ॲड धायकर, ॲड भसमे, ॲड सानप, ॲड वाहुळ, ॲड पल्लोड, ॲड इमरान, ॲड शाईन, ॲड शिंदे, ॲड गायकवाड, ॲड खंडागळे, ॲड पारवे, ॲड नरवडे, अँड.बागवान, अँड.पटेल, अँड.गोरडे, अँड. वाकडे, अँड.जोशी, अँड.वैदय, अँड.शेवतेकर, अँड.उगले, अँड.नलावडे, अँड.नाडे, अँड. सय्यद, अँड.बडे, अँड.इनामदर,अँड. सय्यद, अँड.बडे, अँड. डी.पी.चव्हाण, अँड.मुळे, अँड.जगताप, अँड.नजन, आदिंसह वकील संघ पैठण, शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिक, पत्रकार बांधव, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सर्व वकील संघातील अध्यक्ष, वकील संघातील सदस्य व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.