
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
सीमावर्ती रस्त्यांची दूरवस्था
नांदेड देगलूर
: तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत रस्ते आहेत. हे मुख्य रस्ते इतर राज्यांना जोडणारा असल्यामुळे बाहेर राज्यांना जाणाऱ्या प्रवाशांना नाहक हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागासह राजकीय पुढारी सुद्धा या रस्त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. तेव्हा संबंधितांनी या रस्त्याचे मजबुतीकरण करून जनतेची होणारी गैरसोय दूर करावी, अन्यथा नाईलाजाने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या हाणेगाव ते कोकलगाव, येडूर, देगलूर ते करडखेड, हाणेगाव ते खुतमापूर, रमतापूर, ते कर्नाटक, तेलंगणा राज्य सीमेपर्यंतचे मुख्य रस्ते असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. परिणामी या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जर सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्या रस्त्याचे मजबुतीकरण केल्यास रस्ते चांगले होतील आणि इतर राज्यांना जाणाऱ्या रहदारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, राजकीय पुढाऱ्यांना वेळोवेळी तक्रार करूनही खड्डे बुजविले जातील एवढेच सांगून बोळवण करण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांकडून केवळ खड्डे बुजविण्याचे तोंडी आश्वासन
कोकलगाव, हाणेगाव खुतमापूर, रमतापूर, येडूर, ते कर्नाटक, तेलंगणा सीमेपर्यंतच्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, राजकीय नेत्यांना तोंडी तक्रार करून देखील खड्डे न बुजवता केवळ आश्वासन देत आहेत. आपला देश स्वातंत्र्य झाल्यापासून केवळ या भागातील रस्त्यावर एकवेळ डांबरीकरण झाल्याचे पूर्वज सांगतात. दोन्ही बाजूंनी गगनचुंबी सरकारी बाबुळाची झाडे वाढल्यामुळे रस्त्यावरून पायी चालणाऱ्याऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करावी, अन्यथा नाईलाजाने आमरण उपोषण करण्यात येईल.
सुभाष पाटील,ज्येष्ठ नागरिक, कोकलगाव