
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पिंपरी चिंचवड -बद्रीनारायण घुगे
देहूरोड …देहूरोड मध्ये पहिल्यांदाच अशी इफ्तार पार्टी आपण पाहिली असून ,सर्व जाती धर्माचे लोक या इफ्तार पार्टीत सहभागी होऊन सामाजिक सलोखा राखण्याचे काम करीत आहेत.खरोखरच या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून देशाला व समाजाला एक नवीन संदेश देण्याचे काम केले जात आहे ,असे देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
देहूरोडच्या जामा मस्जिद मध्ये जामा मस्जिद कमिटीच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.या इफ्तार पार्टी मध्ये देहूरोड व परिसरातील सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते.यावेळी मुस्लिम बांधवांची गळाभेट देत त्यांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी जामा मस्जिद कमिटीच्या वतीने विविध फळांचा अल्पोपहार देण्यात आला.यावेळी देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी देखील उपस्थित राहून मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या.
यावेळी देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाचे प्रशासक ऍड.कैलास पानसरे ,राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते ऍड.कृष्णा दाभोळे ,नारायणीदेवी चॅरिटेबल ट्रष्टचे अध्यक्ष ईश्वर आगरवाल , भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष रामदास ताटे , तसेच संपादक अशोक कांबळे , मनसेचे मावळ ता.उपाध्यक्ष मोझेस दास , जेष्ठ नेते विजय पवार , इम्रान शेख , अन्वरअली शेख , तसेच शिवसेनेचे जेष्ठ नेते रमेश जाधव, आणि गुरुमितसिंग रत्तु, मिक्की कोचर , संतोष म्हस्के , दीपक चौगुले , धर्मापाल तंतरपाळे , गोपाळ तंतरपाळे ,सूर्यकांत सुर्वे , मलिक शेख , के.एच.सूर्यवंशी , श्रीजित रमेशन , शंकर स्वामी , परशुराम दोडमणी , अतुल मराठे , गफूरभाई शेख , जावेद शकीलगर , गौस शेख आदी मान्यवर उपस्थित होते.या इफ्तार पार्टी कार्यक्रमाचे नियोज व आयोजन जामा मस्जिद कमिटीच्या वतीने करण्यात आले होते.