
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
नांदेड,देगलूर
देगलूरहून प्रवासी घेऊन निघालेल्या ऑटोचा आणि शीख भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडीचा दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास देगलूर- उदगीर रोडवरील कारेगाव फाट्यावर गंभीर अपघात झाला असून ऑटो आणि टेम्पो ट्रॅव्हलर मधील एकूण १७ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ऑटो मधील चार प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
दिनांक १ एप्रिल रोजी दुपारी तीन ते चार च्या सुमारास देगलूर उदगीर रोडवरील कारेगाव फाटा या ठिकाणी बिदर होऊन शीख भाविकांना घेऊन येणारा टेम्पो ट्रॅव्हलर (क्र.एम.एच.४९ एटी ३६३०) आणि देगलूरहून झरीकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटो(क्र.टीएस १६ युए ३२७७) यांची जोरदार धडक झाल्यामुळे दोन्ही वाहनातील एकूण १७ प्रवासी जखमी झाले आहेत.या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये संग्राम मल्हारी वाघमारे(वय.५५ वर्ष)रा.शिवनी, विठ्ठल भीमराव वरसवाड (वय ३५ वर्ष) रा.झरी, जालिंदर मारोती गुडमे(वय ३६ वर्ष) रा.झरी, मारोती माधवराव भुताळे (वय ५० वर्ष) रा.झरी, शहाजी धोंडीबा झरीकर(वय ४५ वर्ष) रा.झरी, गंगाधर रामराव तोटावर(वय ४० वर्ष) या. पेंडपल्ली, लक्ष्मीबाई संग्राम वाघमारे(वय ५० वर्ष) रा. शिवनी, तालुका देगलूर.जखमींमध्ये देगलूर तालुक्यातील ७ जणांचा समावेश असून पंजाब मधील १० यात्रेकरूंचा समावेश आहे. पंजाबमधील जखमी यात्रेकरू पुढील प्रमाणे-निर्मलसिंग बहादूर सिंग(वय ४२ वर्ष) आसनलखुद जि.बरनाला, सरजीतसिंग पुरोहितसिंग (वय ६५ वर्ष) काळकेगाव जि.बरनाला, सुखदेवसिंग मोन्तासिंग (वय ६० वर्ष) उडाना पंजाब, जयपालसिंग हरवंशलाल (वय ६० वर्ष) जि.नवाशहर पंजाब, प्रीतम सिंग अमरसिंग (वय ८९ वर्ष) गाजियाबाद नंदग्राम, कुलविंदर कौर कुलवंतसिंग(वय ५५ वर्ष) कपूरथला पंजाब, सुंदरजितकौर अवतारकौर(वय ५६ वर्ष), गाजियाबाद नंदग्राम, मोहनसिंग रतनसिंग(वय ६० वर्षे) यमुनानगर पंजाब, अवतारसिंग प्रीतमसिंग(वय ५७ वर्ष) गाजियाबाद नंदग्राम पंजाब, सुरिंदरकौर सुखदेवसिंग(वय ६० वर्ष) नवाढाणा कपूरथला पंजाब.देगलूर पोलीस ठाण्यात अपघाताची घटना कळताच पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ इंद्राळे, सहाय्यक फौजदार सकनुरे यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना वाहनातून बाहेर काढून ॲम्बुलन्स बोलावून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय देगलूर येथे पाठविले.अपघात झाल्यामुळे देगलूर औराद रोडवरे जवळपास तासभर वाहतूक कोंडी झाली होती. ती वाहतूक कोंडी पोलिसांनी दूर करून वाहतूक सुरळीत केली. जखमी झालेल्या प्रवाशांपैकी जलींदर मारोती गुडमे, मारोती माधवराव भुताळे, शहाजी धोंडीबा झरीकर आणि गंगाधर रामराव तोटावार हे ऑटोतील प्रवासी गंभीर जखमी झाले.असून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.