
दैनिक चालु वार्ता वर्धा उपसंपादक-
—————————————-
—————————————-
अमरावती – तिवसा :-जि.प.
यशवंत पंचायतराज अभियान सन २०२४ – २५ अंतर्गत अमरावती विभागाचा निकाल विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती व्दारे जाहीर झाला असुन, त्यानुसार अमरावती विभागातील ५६ पंचायत समित्यांपैकी तिवसा पंचायत समितीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असल्याने पंचायत समिती ११ लाख रुपयाचे बक्षीसाकरीता पात्र ठरली आहे. महाराष्ट्र शासनाव्दारे दरवर्षी यशवंत पंचायतराज अभियान बक्षीस योजना राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदेकरीता राबविण्यात येत असते. स्पर्धेतील सर्वोत्तम पंचायत समितीच्या निवडीकरीता विभागस्तरीय मुल्यमापन समितीव्दारे पंचायत समिती, तिवसा च्या कामकाजाची तपासणी करण्यात आली होती. पंचायत समिती, तिवसा अंतर्गत सामान्य प्रशासन, महिला बालकल्याण,आरोग्य, कृषि,पाणी पुरवठा, मनरेगा,शिक्षण, वित्त,पशुसंवर्धन,समाजकल्याण आणि पंचायत विभागाद्वारे राबविण्यात आलेल्या योजनांची तपासणी विभागस्तरीय मुल्यमापन समितीने केली त्यात पंचायत समितीने केलेल्या कामगीरीप्रमाणे विभागस्तरीय मुल्यमापन समितीने केलेल्या गुणदाणानुसार विभागातील पाचही जिल्हयातील एकुण ५६ पंचायत समित्यांपैकी तिवसा पंचायत समितीलाला सर्वाधिक गुण मिळाल्याने पंचायत समिती, तिवसा अमरावती विभागात प्रथम क्रमांकाकरीता पात्र ठरली शिवाय त्यापुढील राज्यस्तरीय स्पर्धेकरीता पात्र ठरली त्यामुळे पंचायत समिती गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे व सर्व अधिकारी,कर्मचारी वर्ग यांनी आनंद व्यक्त केला.त्याकारणे पंचायत समिती सभागृहात दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी आनंदोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर पुरस्कारासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी संजिता महापात्र जि. प.अमरावती, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रीती देशमुख अमरावती, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) बाळासाहेब बायस जि.प. अमरावती, माजी सभापती कल्पनाताई दिवे, तसेच पंचायत समितीचे सर्व माजी पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.