
दैनिक चालु वार्ता लोहा / प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील मौजे धावरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कर्तव्यदक्ष विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक बी.वाय.चव्हाण यांनी शिक्षण क्षेत्रात ३८ वर्ष ६ महिने अशी प्रदिर्घकाळ सेवा बजावून दि.३१ मार्च २०२५ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा लोहा येथील राधाई मंगल कार्यालयात भव्य सेवापुर्ती गौरव सोहळा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहा मतदार संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर होते तर प्रमुख उपस्थिती श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पुरूषोत्तम धोंडगे , ॲड मुक्तेश्वर धोंडगे, लोहा न.पा. च्या माजी नगराध्यक्षा सौ. आशाताई रोहिदास चव्हाण, माजी शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे माजी जिल्हा परिषद सदस्य भगवानराव हाके,,सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ.गोविंद नांदडे, सेवा निवृत्त कृषी अधिकारी माणिकराव मुकादम, सौ.चित्ररेखा गोरे ,माजी नगराध्यक्ष किरण वटमवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कऱ्हाळे, नायब तहसीलदार अशोक मोकले,शिक्षक नेते हरीभाऊ चव्हाण, नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकादम, दत्ता वाले,शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठूभाऊ चव्हाण, मुख्याध्यापक बी.वाय. चव्हाण यांच्या अर्धांगिनी सौ. वंदनाताई बालाजी चव्हाण, मुलगा पोस्ट मास्तर सुजीत बालाजी चव्हाण, महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा जालना चे शाखा व्यवस्थापक अमोल बालाजी चव्हाण, तसेच त्याच्या मातोश्री, काका,काकुसह चव्हाण पाटील परिवार, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, केरबा सावकार बिडवई, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवाजीराव खुडे,माजी उपनगराध्यक्ष राम सावकार सुर्यवंशी, उपमुख्यमंत्त्र्याचे स्वीय सहाय्यक किरवले,माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार,बीडीओ दशरथ आडेराघो,प्रभारी गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे, शिक्षण विस्तार अधिकारी बाबुराव फसमले, माजी शिक्षण विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे,सुप्रसिद्ध निवेदक विक्रम कदम सर, उद्योजक सुनील सेठ शिंदे, शिवकांता पुंडे, बळीराम केंद्रे , शिवाजी यशवंतराव चव्हाण, मु.अ. मुरतुजा शेख, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार, मु.क. डी.बी.शेख, रुक्माजी चव्हाण, दिलीप सोनवळे, सुर्यकांत वसमतकर, देविदास पाटील चव्हाण, आर पी केंद्रे, संजय तेललवार, मुकुल पवार, रवि चव्हाण,पी.बी.मुंडे, भीमराव पाटील शिंदे,हरि पाटील शिंदे, दिनेश तेललवार, मारोतराव पाटील बोरगावकर,पि.डी.पोले ,पंचगल्ले सर, पंडित पवळे,जयवंत काळे
माधव शामे, यांच्यासह लोहा तालुक्यातील शिक्षक, पालक, विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक बी.वाय.चव्हाण यांचा सर्व मान्यवरांनी सेवापुर्ती गौरव सोहळ्यानिमित्त सपत्नीक भव्य सत्कार केला.
यावेळी पुढे बोलताना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, राजकारणात रिटायरमेंट नसते ज्यावेळी गोविंद नांदडे शिक्षणाधिकारी होते त्यावेळी मी जिल्हा परिषदेचा सभापती होतो. आता ते रिटायर झालेत. बी.वाय.चव्हाण यांनी वेळेला तडजोड केली नाही. आता त्यांनी हाती घडी बांधावी असे सांगून त्यांनी बी.वाय. चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये येण्याची ऑफर दिली. हरीभाऊ चव्हाण हे धडाडीचे नेतृत्व आहे.
यशवंतराव चव्हाण यांनी धडाडीचे राजकारण केले.
बी.वाय.चव्हाण यांनी अनेक शाळेत काम केले. त्यांनी जे संबंध पालक, विद्यार्थी यांच्याशी स्थापन केले त्यांची ही उपरती आहे.मी हरीभाऊ चव्हाण यांच्या कार्यक्रमांना उपस्थित होतो. जेवढे -जेवढे चव्हाण सेवानिवृत्त होतील त्यांच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहतो.
आम्ही शिव -फुले-शाहू-आंबेडकर यांना मानणारा व त्यांच्या विचारांने चालणारे आहोत. बी.वाय. चव्हाण यांना सेवा निवृत्ती बदल शुभेच्छा देतो त्यांना चांगले निरोगी व दिर्घ आयुष्य लाभो असे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन विक्रम कदम सर यांनी केले तर आभार मारोती चव्हाण यांनी मानले .