
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : दुकान व आस्थापनांना मराठी भाषेत नामफलक लावणे बंधनकारक असताना न्यायालयाच्या आदेशानंतर येरवडा भागातील क्रियेटिसिटी मॉलच्या तसेच दर्शनी भागात व मॉलच्या अखत्यारीत तसेच येरवडा क्षेत्रीय कार्यालय, अहिल्या नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील मराठी पाटया न लावलेल्या आस्थापनांवर त्वरीत कारवाई करण्याबाबत कामगार उपायुक्त प्रवीण जाधव यांना आज मनसेच्या शिष्टमंडळ भेटून लवकरात लवकर कारवाई केली नाही तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.या शिष्टमंडळात शहर सचिव रमेश जाधव,उपविभाग अध्यक्ष मनोज ठोकळ,जेमा चव्हाण,अखिल जाधव,सचिन सदभैया,सिद्धार्थ वंजारे, मिलन भोरडे संतोष माने यादी पदाधिकारी उपस्थित होते. मराठी नामफलक न लावलेल्या आस्थापनेंवर कारवाई करण्याचे अधिकार अप्पर कामगार आयुक्त यांना असून त्यांना कामगार उपायुक्त कार्यालयाकडून कारवाई करण्यास मान्यता मिळणेबाबतचे पत्र पाठविले आहे. मान्यता मिळताच दोन दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन जाधव यांनी दिले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव रमेश जाधव यांनी कामगार उपायुक्त यांना दिनांक १३ मार्च रोजी दिले होते तरीही अद्यापही कोणतेही कारवाई केली नाही.
सुप्रिय कोर्टाने दुकाने आस्थापन यांना नामफलक मराठीच असावा असा सुप्रिया कोर्टाने निकाल दिलेला असताना दोन महिन्यापूर्वी येरवडा येथील क्रियेटीसिटी मॉलच्या दर्शनी भागात मोठ्या अक्षरात इंग्रजी भाषेत नामफलक लावला आहे तसेच मॉलच्या अख्यारीत येणाऱ्या अनेक दुकानांवर अजूनही इंग्रजी भाषेत नामफलक आहेत.न्यायालयाने निकाल दिल्यानंतर मॉलच्या दर्शनी भागात इंग्रजीमध्ये फलक लावून या मॉलने न्यायालयाचा तसेच असून मराठी भाषेचा अवमान केला आहे.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) सुधारणा अधिनियम २०२२ तील कलम ३६ ‘क’ (१)च्या कलम ६ अन्वये नोंदणी केलेल्या प्रत्येक दुकान-आस्थापनाला लागू असलेल्या कलम ७ ची अंमलबजावणी न केल्याने सदर मॉलला कलम २९ प्रत्येक दिवसाला २,००० रूपये दंड आकरून सदर नियमांचे उल्लंघन केल्याने मॉलचे शॉप ॲक्ट लायसन्स(दुकान कायदा परवाना ,गुमास्ता परवाना)रद्द करण्याचे अधिकार कामगार कार्यालयास आहेत.