
दैनिक चालू वार्ता वैजापूर प्रतिनिधी -अनिल सुर्यवंशी
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा २ चे लाईव्ह बेमिनार आज सकाळी दहा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत यशस्वीरित्या पूर्ण झाले.
यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब, कृषिमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे साहेब, पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळ साहेब, पाणी फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सिने अभिनेता आमिर खान जी साहेब, आत्माचे प्रकल्प संचालक परिमल सिंह सर, प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी,पद्मश्री पोपटराव पवार मृदा विशेषज्ञ कोळेकर यांच्या उपस्थितीत हा बेमिनार पार पाडला.
मुख्यमंत्री साहेबांनी ही योजना शेतीतील गुंतवणूक वाढवणारी योजना आहे सर्वांनी लाभ घ्यावा असे सांगितले.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी गाव पातळीवर गाव आराखडे तयार करून गावातील शेतकऱ्यांना सर्व सुविधा पुरवाव्या असे सरपंचांना सांगितले.
प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी पोखरा प्रकल्प २ चा परिचय करून दिला.
विजय कोळेकर मृदा विशेषज्ञ हवामान अनुकूल गावाचा आराखडा कसा तयार करावा याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली.
पाणी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमीर जी यांनी त्यांनी केलेल्या २०१६पासूनच्या २०२५ पाणी फाउंडेशन चा छोटासा आढावा सांगितला.
पाणी फाउंडेशन चे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अविनाश पोळ सरांनी फार्मर कप स्पर्धेतील गटशेतीतून आपला शेतीचा खर्च कमी कसा करावा, शेती शाळा, कृषी विभागाच्या भेटी त्यांची संवाद साधणे, उदाहरणासहित या प्रकारचे मार्गदर्शन दिले.
सागर खटकाळ कृषी अभियंता यांनी जलसंवर्धन कसे करावे, कधी करावे, कोणत्या पद्धतीने, पाऊस पाण्याचा ताळेबंद, मृदा व जलसंधारण याबद्दल माहिती सांगितली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम कान्हे मॅडम यांनी केले.