
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नांदेड देगलूर
बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा देगलूर येथे दि.02/04/2025 रोजी शाखेचे लॉकर धारक भूमन्ना चिंतावर यांनी लॉकर ऑपरेट करताना त्यांच्या नजरचुकीने 40 ग्रॅम वजनाची सोने लगड खाली पडली होती. ते शाखेच्या बाहेर निघून गेल्यानंतर शाखेचे कर्मचारी राजेश देशमुख यांनी निरंक झालेले सोनेतारण कर्ज प्रकरणी पाकीट आणण्यासाठी स्ट्राँगरूम मध्ये गेले असता त्यांच्या निदर्शनास सोने लगड पडली व त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता शाखा व्यवस्थापक संजय घोंगडे यांच्याकडे सुपूर्द केली. शाखा व्यवस्थापक यांनी संस्थेचे विभागीय व्यवस्थापक रोशन अग्रवाल साहेब यांना सोने वस्तू स्ट्राँगरूम मध्ये मिळाली याची माहिती देऊन त्यांच्या सूचनेनुसार लॉकर ऑपरेट करण्यास आलेल्या तीन ते चार सभासदाची विचारपूस करून सापडलेल्या वस्तूची वर्णन व वजनाची शहानिशा केली असता शाखेचे ज्येष्ठ सभासद चिंतावर भूमन्ना मोतीराम यांनी वस्तूची वर्णन व वजन
सांगितल्याप्रमाणे बरोबर जुळल्यानंतर त्यांचीच वस्तू आहे हि खात्री पटल्यानंतर त्यांना वस्तू देण्याचे ठरले. त्या प्रमाणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय भाईजी व संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरव्यवस्थापक कैलास कासट साहेब व विभागीय व्यवस्थापक रोशन अग्रवाल साहेब यांच्या सुचणे प्रमाणे देगलूर शाखेचे प्रतिष्ठित सभासद व पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत सदर वस्तू चिंतवार भूमन्ना मोतीराम यांना सर्वा समक्ष परत केले असता बुलडाणा अर्बनचे कर्मचारी राजेश देशमुख यांच्या प्रामाणिकपणाचे व वागणुकीचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच भूमन्ना चिंतावर यांनी संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे जाहीर आभार मानले. या छोट्या खाणी कार्यक्रमास उपस्थित देगलूर येथील प्रतिष्ठित व्यापारी सभासद सुभाषजी बच्चेवार, प्रकाशशेठ मैलागिरे, संजयजी मिसाळे, जयराम सावकार रेखावार आणि पत्रकार सतीश पांडवे, संतोष मनधरणे, रामपूरचे सरपंच पंकज पांडवे, बिरादार शिवकुमार व संस्थेचे विभागीय लेखापरीक्षक संतोष दरेगावे होते. सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाखाव्यवस्थापक . संजय घोंगडे, हणमंत होट्टे, बालाजी अटमलवार, राजेश देशमुख, व्यंकट बामणे, बोरगे योगेश, बडुरे विश्वनाथ, प्रकाशअंकमवार, हनुमंत आटमलवार, नागेश इरलावार, भूताळे शैलेंद्र, महेश दोंतीवार यांनी परिश्रम घेतले