
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी वाशिम रिसोड -भागवत घुगे
रिसोड. चांगले उत्पन्न मिळवून देणारे नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कापसाच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरवेळी दिवाळीपासून विक्री सुरू झाल्यानंतर मार्चपर्यंत १०० टक्क्यांपर्यंत कापूस विकला जातो. यावर्षी मात्र मार्च महिना संपला असून जवळपास ७० टक्केच कापसाची विक्री झाली आहे. भाववाढीच्या आशेने मांडवा कुऱ्हा भर मोरगव्हाण वाडी बोरखेडी सावरगांव मुंढे लोणी गंधारी परिसरातील बहुतेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवला आहे. कापसाला साडेसहा ते साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव आहे.
दोनवर्षी मिळालेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांनी दोन वर्षापासून कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड केली. परंतु अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले. अतिवृष्टी आणि रोगामुळे कपाशीच्या
शेतकरी निराशच : गतवर्षीच्या निराशेनंतर शेतकऱ्यांना नववर्षात कापसाचे दर किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल पोहचण्याची अपेक्षा होती. मात्र, दरात घट झाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. परिसरात शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने ते साडेसात कापूस घरातच साठवून ठेवला आहे. कापसाचा भाव साडेसहा ते हजारांपर्यंतच राहिल्यास हाती काय राहील, अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
गरजूंनी पडत्या भावात विकला कापूस:
जून महिन्याच्या सुरुवातीला अनेक अल्पभूधारक व मध्यम वर्गातील शेतकरी खते, कीटकनाशक औषधी, बियाणे व्याजाने व चढ्या दराने बाजारातून घेत असतात. अशा शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने कापूस निघताच त्यांनी मिळेल त्या भावात कापूस विकला आहे. काही शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला असला तरी भाव वाढत नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे.
…….
उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. कापसाची भाव वाढ होईल या आशेने कापूस साठवूनही ठेवला आहे. पण मार्च महिना संपत आला तरी अजूनही अपेक्षित भाववाढ झाली नाही. २०२३ वर्षी गुणवत्त्-पेनुसार १० ते १२ हजार रुपयांपर्यंतचे भाव
देणारा कापूस २०२५ मध्ये मात्र सात हजारांपर्यंतच पोहोचला आहे. भाव नसल्यामुळे लागवडीसाठी लागलेला खर्च निघणे कठीण झाले आहे. मूलभूत गरजांसाठी पैसा अत्यावश्यक असला तरी दर वाढतील या अपेक्षेने परिसरातील शेतकऱ्यांनी अद्याप कापूस बाजारात विक्रीसाठी नेला नाही.
विश्वनाथ मुंढे माजी सरपंच
शेतकरी सावरगांव
……..