
दैनिक चालु वार्ता वर्धा उपसंपादक – अवधूत शेंद्रे
—————————————-
वर्धा – आष्टी :-आमदार सुमित वानखेडेंच्या प्रयत्नाने आर्वी विधानसभा क्षेत्रातील तळेगाव (शा.पं.) आगाराला आगार स्थापनेनंतर प्रथमच पाच नवीन बसेस मिळाल्या आहेत. त्या बसेसचे लोकार्पण आमदार सुमित वानखेडे यांच्या हस्ते व आमदार दादाराव केचे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या आगाराला अस्तित्वात आल्यापासून कधीही नवीन बस मिळाल्या नव्हत्या. आमदार सुमित वानखेडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या परिणामी ५ नवीन बसेस तळेगाव आगाराच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. नुकत्याच आर्वी आगारालाही नवीन बसेस आमदार वानखेडेंनी मिळवून दिलेल्या आहेत.आमदार सुमित वानखेडे यांनी या नव्या बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर आणि आरामदायी होणार असून चालक-वाहक बांधवांसह प्रवाश्याना ही सुविधा अधिक सोयीस्कर व आरामदायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला. या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांचे आभार सुमित वानखेडे यांनी मानले असुन भविष्यात अजून अधिक सुविधा मिळवण्यासाठी माझे प्रयत्न अविरत सुरू राहतील अशी ग्वाही दिली. या ऐतिहासिक क्षणी तळेगाव आगार व्यवस्थापक आनंदी बेलूरकार, कमलाकर निंभोरकर, सचिन होले, अशोक विजयकर, गुणवंत नरंगे, देवानंद डोळस, विशाल गाडगे, सचिन गावंडे यांच्यासह आगार कर्मचारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.